शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: बच्चू कडूंचा पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार?, थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार
3
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
4
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
5
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
7
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
8
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
9
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
10
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
11
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
12
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
13
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
14
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
15
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
16
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
17
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
18
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
19
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
20
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

कोमट तेलाने केसांची मालिश करा, मग बघा कमाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 13:17 IST

महिला असो किंवा पुरूष प्रत्येक व्यक्ती आपल्या केसांवर प्रेम करते. केस काळे आणि मुलायम असावेत अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. हल्लीच्या काळात बाजारात अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध होतात.

महिला असो किंवा पुरूष प्रत्येक व्यक्ती आपल्या केसांवर प्रेम करते. केस काळे आणि मुलायम असावेत अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. हल्लीच्या काळात बाजारात अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध होतात. ही उत्पादनं तयार करणाऱ्या प्रत्येक कंपनींकडून असा दावा करण्यात येतो की, या उत्पादनांच्या वापराने तुमच्या केसांबाबतच्या सगळ्या समस्या दूर होतील आणि केस सुंदर होतील. पण यामध्ये कितपत तथ्य आहे, हे आपण सर्वच जाणतो. पण खरं पाहायला गेलं तर केसांचं सौंदर्य टिकवून ठेवणं इतकं अवघडही नाही. काही घरगूती उपाय केल्यानं केसांच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल.

कोमट तेलाने केसांना मालिश केल्यानं काही दिवसांतच केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते. कोमट तेल केसांना लावल्यानं तेल थेट केसांच्या मुळापर्यंत पोहोचते. सामान्य तेलापेक्षा कोमट तेलानं मालिश करणं केसांचं आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर ठरतं. जाणून घेऊयात कोमट तेल केसांना लावल्यानं कोणते फायदे होतात...

(Image Credit : Patrika)

1) कोमट तेल केसांना लावल्यानं ते थेट केसांच्या मुळापर्यंत जातं. यामुळे केसांच्या मुळांजवळील स्कॅल्पवर मॉइश्चर(डोक्याची त्वचा) टिकून राहण्यास मदत होते. ज्यामुळे केस आणि स्कॅल्पचे आरोग्य चांगले राहते.

(Image Credit : miracleherbs.in)

2) कोमट तेलानं मालिश केल्यानं ब्लड फ्लो नीट राहतो. त्यामुळे केसांची वाढ झपाट्याने होते. 

(Image Credit : healthline.com)

3) जर तुमची डोक्याची त्वचा फार ड्राय असेल तर, कोमट तेलानं मालिश करणं फायदेशीर ठरतं. ज्या व्यक्ती जास्तीतजास्त वेळ घरातून बाहेर राहतात किंवा सतत उन्हात काम करतात त्यांच्यासाठी कोमट तेलानं मालिश करणं फायदेशीर ठरतं.

4) कोमट तेलानं मालिश केल्यानं केस गळणं कमी होते. मालिश करताना केस थेट मुळांजवळ गेल्यानं केसांची मुळं मजबूत होण्यास मदत होते. 

5) केसांमध्ये कोंडा झाला असेल तरीदेखील कोमट तेलानं केसांना मालिश करणं फायदेशीर ठरतं.

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स