ब्लड प्रेशरवर योगर्टचा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 00:53 IST2016-03-05T07:51:56+5:302016-03-05T00:53:05+5:30

आठवड्यातून पाच किंवा त्यापेक्षा जास्त वेळा योगर्ट खाल्ल्यामुळे महिलांमध्ये हाय ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते, असे एका रिसर्चमधून दिसून आले. 

Yogurt's remedy on blood pressure | ब्लड प्रेशरवर योगर्टचा उपाय

ब्लड प्रेशरवर योगर्टचा उपाय

िलांचे आरोग्य फार महत्त्वाचे असते. घरकाम आणि आॅफिसवर्क अशी दुहेरी जबाबदारी सांभळताना तिच्या आरोग्याव व्हायचा तो परिणाम होतोच.

महिलांमध्ये हाय ब्लड प्रेशरची (उच्च रक्तचाप) समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्यावर एक घरगुती उपाय आता उपलब्ध झाला आहे.

आठवड्यातून पाच किंवा त्यापेक्षा जास्त वेळा योगर्ट खाल्ल्यामुळे महिलांमध्ये हाय ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते, असे एका रिसर्चमधून दिसून आले.

ज्या महिला महिन्यातून केवळ एकदाच योगर्ट खातात त्यांच्या तुलनेत पाच किंवा अधिक वेळा योगर्ट खाण्याऱ्या महिलांमध्ये हाय ब्लड प्रेशर २० टक्क्यांनी कमी होते.

woman eat yogurtr

बोस्टन विद्यापीठातील प्रमुख संशोधक जस्टिन ब्युएंडिया यांनी माहिती दिली की, दुग्धजन्य पदार्थ, विशेषकरून योगर्टमुळे हृदयविकारांला कारणीभूत हाय ब्लड प्रेशरचा धोका कमी होतो. चीज आणि दुधाचाही सकारात्मक परिणाम दिसून येतो; मात्र सर्वाधिक इफेक्ट योगर्टचाच होतो.

‘नर्सेस हेल्थ स्टडी’ने गोळा केलेल्या २५-५५ वयोगटातील महिलांच्या माहितीचे संशोधकांनी विश्लेषण करून हा निष्कर्ष काढलेला आहे. 

women blood pressure

Web Title: Yogurt's remedy on blood pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.