एकाच जागी काम करण्यामुळे वाढतो मधुमेहाचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:20 IST2016-02-07T06:50:30+5:302016-02-07T12:20:30+5:30
कॉम्प्युटरसमोर घालवलेल्या प्रत्येक अतिरिक्त तासाबरोबर मधुमेहाचा धोका 22% वाढतो असा धोक्याचा इशारा संशोधकांनी एका अध्ययनाअंती दिला आहे.

एकाच जागी काम करण्यामुळे वाढतो मधुमेहाचा धोका

तुम्ही व्यायाम जरी करत असले तरीदेखील आॅफिसमध्ये कॉम्प्युटरसमोर घालवलेल्या प्रत्येक अतिरिक्त तासाबरोबर मधुमेहाचा धोका 22% वाढतो असा धोक्याचा इशारा संशोधकांनी एका अध्ययनाअंती दिला आहे. एकाच जागी अधिका काळ बसून राहणे म्हणजे मधुमेहाला खुले आमंत्रणच आहे असे म्हणा ना! या संशोधनातून सार्वजनिक आरोग्य धोरणात आवश्यक आणि योग्य ते बदल करण्यास मदत होणार असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.
सर्वात आश्चर्याची बाब जी या अध्ययनातून समोर आली ती म्हणजे, व्यक्ती व्यायाम जरी करत असेल तरीदेखील त्याच्यावरही मधुमेहाची टांगती तलवार तशीच असते. नेदरलँडच्या मास्ट्रीक्ट विद्यापीठातील जुलियन वॅन डर बर्ग व सहकाºयांनी बसून काम करण्याचा कालावधी आणि पॅटर्नचा ग्लुकोज पचनाशी असणाºया संबंधांचा अभ्यास केला. सरासरी वय 60 असणाºया 2497 लोकांच्या या स्टडीमध्ये सामावेश करण्यात आला होता. सलग आठ आठवडे दिवसभर त्यांना ‘अॅक्सेलोमीटर’ घालण्यास लावले.

यावेळी एकाच जागी बसण्याचा काळ, जास्तीत जास्त एकाच जागी बसण्याची वेळी, किती वेळा बे्रक घेतात अशी सगळी माहिती गोळा करण्यात आली. 1395 (56%) लोकांचे ग्लुकोज मेटाबॉलिज्म सामान्य होते, 388 (15%) लोकांना मेटाबॉलिज्ममध्ये त्रास होता तर 714 (29%) लोकांना टाईप-2 मधुमेह होता. इतरांच्या तुलनेत मधुमेह असलेले लोक दिवसातून 26 मिनिटे अधिक काळ एकाच जागी बसलेले असतात.