'या' स्वस्तात मस्त घरगुती उपायांनी वाढवा केसांचं आयुष्य, पैशांचीही होईल बचत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 12:27 IST2019-07-11T12:18:41+5:302019-07-11T12:27:02+5:30
हे नैसर्गिक उपाय वापरून तुम्ही केसांचं आयुष्य वाढवू शकता आणि सौंदर्यही खुलवू शकता.

'या' स्वस्तात मस्त घरगुती उपायांनी वाढवा केसांचं आयुष्य, पैशांचीही होईल बचत!
केसगळतीची वेगवेगळी कारणे असतात. खराब आहार, खराब जीवनशैली, तणाव, प्रदूषण, धूळ-माती, मद्यसेवन अशी काही मुख्य कारणे सांगता येतील. या गोष्टींमुळे केस कमजोर होतात. यावर अनेकजण वेगवेगळे उपाय करतात, वेगवेगळे केमिकल प्रॉडक्ट्स वापरतात, वेगवेगळे शॅम्पू वापरतात. पण याने तुमचे केस आणखी कमजोर होतात. जोपर्यंत तुम्ही नैसर्गिक पद्धतीने केसांची काळजी घेणार नाही, तोपर्यंत केसांचं नुकसान होणार.
अशात केसांचं आयुष्य आणि सौंदर्य वाढवण्यासाठी तुमच्या आहारात आणि लाइफस्टाईलमध्ये बदल करणे गरजेचे आहे. असं केल्यास केसगळती कमी होऊ शकते. त्यामुळे तुमच्या मदतीसाठी आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत. या टिप्सच्या माध्यमातून तुम्ही केसांचं आयुष्य वाढवू शकता.
हेल्दी फूडचं करा सेवन
केसांचं आयुष्य वाढवायचं असेल तर हेल्दी फूड खाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तुमच्या आहारात प्रोटीन, पोटॅशिअम आणि इतरही अनेक पोषक तत्व असले पाहिजे. हिरव्या भाज्या आणि फळांचं सेवन तुम्ही केलं पाहिजे. यातील पोषक तत्वांमुळे केस मजबूत होतात आणि त्यांना नैसर्गिक सौंदर्य प्राप्त होतं.
अंड लावा
अंड्यात प्रोटीन आणि फॉस्फोरस अधिक प्रमाणात असतं. याने केसांचं आरोग्य चांगलं राखलं जातं. तसेच अंड हे मॉइश्चरायजिंग एजंट म्हणून काम करतं. ज्याने केसातील अतिरिक्त तेल कमी केलं जातं. यासाठी अंड एका बाउलमध्ये मिश्रित करा आणि ते केसांना चांगल्याप्रकारे लावा. जवळपास १० ते १५ मिनिटांना केस कोमट पाण्याने धुवावे.
अॅलोव्हेरा
अॅलोव्हेरामध्ये असलेल्या अॅंटी-ऑक्सिडेंट आणि अमीनो अॅसिडमुळे केस हेल्दी ठेवण्यास मदत मिळते. याने केसांची पीएच लेव्हल नियंत्रित ठेवली जाते आणि डोक्याची त्वचाही निरोगी राहते. अॅलोव्हेरामध्ये लिंबाचा रस आणि खोबऱ्याचं तेल टाका. हे मिश्रण केसांना आणि डोक्याच्या त्वचेला २० मिनिटे लावा. नंतर केस धुवावे.
मेहंदी
मेहंदीमध्ये पॅरा-फेनाइललेनेडियामाइन असतं. याने केस हेल्दी राहतात. तसेच याने केस पांढरे होत नाहीत. मेहंदी गरम पाण्यात भिजवा, नंतर १५ मिनिटे केसांना लावून ठेवा. नंतर केस चांगले स्वच्छ करा.
ब्राउन शुगर
ब्राउन शुगरमध्ये मोलासेस असतं, ज्याने केसात कोंडा होण्याची समस्या दूर होते. तसेच याने केसगळतीही थांबते. ब्राउन शुगर तुम्ही कडींशनरमध्ये मिश्रित करून लावू शकता.
(टिप : वरील लेखात देण्यात आलेले सल्ले हे माहिती म्हणून देण्यात आले आहेत. यांचा वापर करण्याआधी एकदा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. कारण यातील काही गोष्टींची कुणाला अॅलर्जी असू शकते.)