हिवाळ्यात मॉयश्चरायझर वापरताना !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2016 13:15 IST2016-12-25T13:14:20+5:302016-12-25T13:15:30+5:30
हिवाळ्यात त्वचा शुष्क होत असल्याने मॉयश्चरायझर किंवा नाईटक्रीम, कोल्डक्रीम वापरणे अत्यावश्यक असते.

हिवाळ्यात मॉयश्चरायझर वापरताना !
ह वाळ्यात त्वचा शुष्क होत असल्याने मॉयश्चरायझर किंवा नाईटक्रीम, कोल्डक्रीम वापरणे अत्यावश्यक असते. चेहऱ्यासाठीचे मॉयश्चरायझर हे हात-पाय व अंगाला लावण्यासाठीपेक्षा वेगळे असते. तसेच आपल्या त्वचेची गरज व कंडिशनप्रमाणे यात बदल करणे आवश्यक असते.
* कोरड्या त्वचेसाठी क्रीम स्वरूपातील व नॉर्मल त्वचेसाठी क्रीम किंवा लोशन स्वरूपातील मॉयश्चरायझर वापरावा.
* ज्यांची त्वचा तेलकट आहे किंवा मुरूम येण्याची सवय आहे अशा व्यक्तींनी तेल नसलेले मॉयश्चरायझर वापरावा.
* तरूण मुला-मुलींना कमी तेल असलेले मॉयश्चरायझर उपयुक्त ठरतात. कारण तरूणवयात त्वचेची आर्द्रता टिकवण्याची क्षमता जास्त असते. तिशीच्या पुढच्या व्यक्तींनी जरा जास्त तेल असलेले मॉयश्चरायझर वापरल्यास जास्त फायदा होतो.
* मॉयश्चरायझर चेहऱ्यावर लावल्याने त्वचेतील आर्द्रता टिकून तर राहतेच, पण त्वचेवर एक संरक्षण कवच तयार होऊन मेकअप करण्यास ती योग्य होते.
* मॉयश्चरायझर हा क्रीम, लोशन, द्रव, जेल या स्वरूपात येतो. त्यामध्ये असलेल्या रसायनांवर तो किती घट्ट किंवा पातळ असणार ते अवलंबून असतं.
* नारळाचा समावेश असलेलं मॉयश्चरायझर त्वचेसाठी अधिक चांगलं असतं. त्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या मृदू आणि तरुण बनते. हा तजेला दिवसभर टिकतो.