बीबी आणि सीसी क्रिम मधील फरक तुम्हाला माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 01:14 PM2019-01-17T13:14:34+5:302019-01-17T13:16:32+5:30

आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी महिला कोणतेही उपाय करण्यासाठी तयार असतात. त्या सतत नवनवीन ब्युटी प्रोडक्ट्सचा शोध घेतच असतात. अनेकदा अनेक महिला असे प्रोडक्ट्स शोधत असतात, जे थोडेसे वेगळे आणि कमी वेळात जास्त फायदा देणारे असतात.

What is the diffrence between bb and cc beauty cream know the benefits | बीबी आणि सीसी क्रिम मधील फरक तुम्हाला माहीत आहे का?

बीबी आणि सीसी क्रिम मधील फरक तुम्हाला माहीत आहे का?

googlenewsNext

आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी महिला कोणतेही उपाय करण्यासाठी तयार असतात. त्या सतत नवनवीन ब्युटी प्रोडक्ट्सचा शोध घेतच असतात. अनेकदा अनेक महिला असे प्रोडक्ट्स शोधत असतात, जे थोडेसे वेगळे आणि कमी वेळात जास्त फायदा देणारे असतात. वेगवेगळ्या क्रिम, लोशन आणि मॉयश्चरायझर वापरण्यासाठी सध्या कोणाकडे वेळ नसतो. त्यामुळे प्रत्येकजण कमी वेळात जास्त फायदा देणाऱ्या प्रोडक्ट्सचा शोध घेत असतात. बीबी आणि सीसी क्रिम तुमची ही गरज पूर्ण करण्याचे काम करतात. जाणून घेऊयात बीबी आणि सीसी क्रिम त्वचेसाठी कसं काम करतात आणि यामुळे त्वचेला होणाऱ्या फायद्यांबाबत...

बीबी क्रिम

बीबी क्रिम म्हणजे ब्लेमिश बाम होय. म्हणजेच चेहऱ्यावरील सर्व डाग नाहीसे करून चेहऱ्याची त्वचा ग्लोईंग करणारा बाम. खरं तर बीबी क्रिमचा शोध डर्मेटोलॉजिस्ट क्रिस्टिन श्रेमेकने 1950मध्ये लावला होता. ते अनेक दिवसांपासून अशी क्रिम तयार करण्याच्या प्रयत्नात होते. ज्यामुळे त्वेचेचं उन्हापासून रक्षण करण्यासोबतच चेहऱ्यावरील डाग नाहीसे करण्यासही मदत करेल.त्याचबरोबर त्वचेला मॉयश्चराइज्ड करण्यासाठीही मदत होईल. 

बीबी क्रिम असं करते काम

साधारणतः महिला सकाळी उठल्यानंतर आपला चेहरा धुवून मॉयश्चरायझर, सनस्क्रीन आणि फाउंडेशनचा बेस लावतात. यानंतर अनेक स्त्रिया अ‍ॅन्टी-एजिंग क्रिम किंवा कंसीलरचाही वापर करतात. वेळेच्या अभावामुळे प्रत्यकवेळी त्यांना सर्व मेकअप करणं शक्य होतचं असं नाही. तेच काम बीबी क्रिम फक्त एकटीच करते. अनेक बीबी क्रिम तयार करताना हायलूरोनिक अ‍ॅसिड आणि ग्लिसरीनचा वापर करण्यात येतो. जे त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी मदत करतात. याशिवायही अनेक कारणांसाठी बीबी क्रिम फायदेशीर ठरते. 

- उन्हापासून त्वचेचं रक्षण करण्यासाठी मदत करते. 

- यामध्ये असलेलं लिकोराइस त्वचेला उजाळा देण्यासाठी मदत करतं. तसेच त्वचा टोन करण्यासाठीही आणि पिंपल्सपासून बचाव करण्यासाठी मदत करते. 

- सिलिकॉन आणि लाइट रिफ्लेक्टिंग सारखे गुणधर्म त्वचा कोमल आणि डागरहित करण्यासाठी मदत करतात. 

- व्हिटॅमिन सी, ई आणि ए अ‍ॅन्टी एजिंगचं काम करतात.
 
- बीबी क्रिम लावल्यानंतर अनेक क्रिम्स किंवा लोशन्स लावण्याची गरज भासत नाही. 

कशी लावाल?

चेहरा धुवून थोडी क्रिम बोटांवर घ्या. चेहरा आणि मानेवर क्रिमचे डॉट्स लावा आणि सर्क्युलर मोशनमध्ये संपूर्ण चेहऱ्यावर पसरवा. गरज असेल तर दिवसातून दोन वेळा तुम्ही लावू शकता. 

टिप्स :

जर तुमची त्वचा कोरडी असेल तर बीबी क्रिम लावण्याआधी सीरम किंवा मॉयश्चरायझर वापरा. त्यामुळे बीबी क्रिम व्यवस्थित चेहऱ्यावर पसरण्यास मदत होईल आणि तुम्हाला क्लासी लूक मिळण्यास मदत होईल. 

सीसी क्रीम

बीबी क्रीमनंतर सीसी क्रिमचा जन्म कोरियामध्ये झाला होता. कलर कंट्रोल आणि करेक्टिंग क्रिमचा शॉर्ट फॉर्म म्हणजे, सीसी क्रिम. यामध्ये बीबी क्रिममध्ये वापरण्यात आलेल्या सर्व गोष्टींचा वापर करण्यात आला आहे. परंतु बीबी क्रिम पेक्षा सीसी क्रिम थोडीशी लायटर फॉर्म मध्ये आहे. त्याचबरोबर ही क्रिम त्वचेचं उन्हापासून संरक्षण करण्यासाठी बीबी क्रिमपेक्षाही फायदेशीर ठरते. 

सीसी क्रिम असं करते काम 

सीसी क्रिम त्वचेला स्मूद इफेक्ट देण्यासाठी मदत करते. त्वचेचा अनइव्हन टोन ठिक करण्यासाठी सीसी क्रिमचा वापर करण्यात येतो. त्वचेमध्य अगदी सहज मूरून तुमचा लूक आणखी बहरवण्यासाठी ही क्रिम मदत करते. ही क्रिम लावल्यानंतर चेहऱ्यावर काही लावल्यासारखे वाटतच नाही. तसेच चेहरा उजळण्यासह मदत होते. या क्रिममध्ये कोणत्याही प्रकारचा चिकटपणा नसतो. त्यामुळे ऑयली त्वचेसाठीही ही क्रिम उत्तम पर्याय ठरते. पिंपल्स आणि अॅक्ने दूर करण्यासाठीही या क्रिमचा वापर केला जाऊ शकतो. सीसी क्रिम वेगवेगळ्या शेड्समध्ये बाजारामध्ये उपलब्ध असते. त्यामुळे तुमच्या स्किन टोननुसार तुम्ही या क्रिमची निवड करू शकता. 

कशी लावाल?

आपल्या बोटांवर थोडी क्रिम घ्या आणि चेहरा आणि मानेवर त्याचे स्पॉट्स तयार करून घ्या. सर्क्युलर मोशनमध्ये संपूर्ण चेहऱ्यावर क्रिम पसरवून घ्या. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हातांवर घेऊनही वापरू शकता. गरज असल्यास तुम्ही पुन्हा एकदा क्रिम वापरू शकता. 

Web Title: What is the diffrence between bb and cc beauty cream know the benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.