सध्याच्या काळात सगळेच मुलं आणि मुली जिन्स घालतात. आकर्षक वेगवेगळ्या स्टाईलच्या आणि रंगाच्या जिन्स घालायची आवड सगळ्यांना असते. पण अनेकजण जिन्स घालत  असताना काही चुका करतात. त्यामुळे त्यांना याचे परीणाम सुद्धा भोगावे लागतात. आज आम्ही तुम्हाला  जिन्सशी निगडीत काही गोष्टी सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही जिन्स घालण्यासोबत  काही टीप्स वापरून अधिक सूंदर दिसू शकता.

Image result for tight jeans

जर तुम्ही जास्त घट्ट किंवा बॉडी फिटिंग जिन्स घालून ऑफिसला जात असाल तर तुमचा लूक खराब होण्याची शक्यता असते. त्यामध्ये तुम्ही आहात त्यापेक्षा जास्त लठ्ठ दिसू शकता. त्यामुळे जिन्स घेत असताना आपल्या कमरेचा आकार पाहून  ट्राय करून पाहा मगचं विकत घ्या.

जास्त लूज जीन्स घालून जर तुम्ही कामासाठी बाहेर जात असाल तर ते खूपच खराब दिसतं. तुम्ही घरचे कपडे घालून आला आहात असं सुद्धा वाटू शकतं. यामध्ये जे बारीक लोकं असतात ते सुद्धा चबी दिसायला लागतात. तसंच प्रोफेशनल लुक दिसून येत नाही. 

सध्याच्या काळात एसिड वॉश जिन्स या वापरात नसतात. त्यामुळे तुम्ही डार्क वॉश जिन्सचा वापर करायला हवा. जास्त लूज जिन्स घातल्यास मागून  दिसायला खूप विचित्र दिसत असतं. त्यामुळे  व्यवस्थित कमरेवरचं जिन्स घालावी. जास्त लांब जीन्स सुद्धा काहीवेळा बूटांवर सुट करत नाही. फोल्ड करून घालण्यापेक्षा स्वतःच्या मापाची जिन्स वापरा. 

Image result for boyfriend jeans

रिप्ड आणि बॉयफ्रेन्ड जिन्स घालण्याची अनेकांना हौस असते. पण अशा टाईप्सच्या जिन्स सगळ्यांनाच चांगल्या दिसतात असं नाही. अनेकदा खूप ऑकवर्ड वाटेल असा सुद्धा लूक या जिन्सला येत असतो. त्यामुळे तुम्हाला जर सूट होत असेल तर तरच त्या जिन्स खरेदी करा. ( हे पण वाचा-टॅटूमुळे होत असलेले इन्फेक्शन रोखण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी)

Web Title: Wearing jeans everyday do not make these mistakes with jeans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.