Hair Care Tips : थंडीपासून बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त लोक आंघोळ करताना केस गरम पाण्यानं धुतात. पण नेहमीच हा प्रश्न विचारला जातो की, गरम पाणी केसांसाठी चांगलं असतं का? याचं उत्तर नाही असं आहे. गरम पाण्यामुळे केस खूप जास्त डॅमेज होतात. गरम पाण्यानं केसांचं काय काय आणि कसं नुकसान होतं तेच आम्ही सांगणार आहोत.
नॅचरल ऑइल नष्ट होतं
आपल्या डोक्याच्या त्वचेमध्ये नॅचरल ऑइल असतं, जे केसांना पोषण देण्याचं काम करतं. या ऑइलमुळे केस चमकदार होतात. अशात जेव्हा तुम्ही गरम पाण्यानं केस धुता, तेव्हा हे नॅचरल ऑइल निघून जातं. ज्यामुळे केस निर्जीव आणि रखरखीत दिसतात.
रंग जाणं
कलर केलेल्या केसांसाठी गरम पाण्याच्या तुलनेत नॉर्मल पाणी अधिक फायदेशीर असतं. गरम पाण्यानं केसांचा रंग उडून जातो. आणि केस पांढरे दिसू लागतात.
डॅंड्रफची समस्या
हिवाळ्यात केसांमध्ये डॅंड्रफची समस्या गरम पाण्यामुळे जास्त होते. कारण गरम पाण्यानं डोकं धुतल्यानं डोक्याची त्वचा ड्राय होते. ज्यामुळे खाज आणि जळजळ अशाही समस्या होऊ लागतात.
केस कमजोर होणं
गरम पाण्यामुळे डोक्याच्या त्वचेमधील ब्लड सर्कुलेशन कमी होतं. ज्यामुळे केस कमजोर होतात आणि केसगळतीची समस्या होते.