शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

तरूण दिसायचंय?; चिंचेचा फेसमास्क ट्राय करा, मग पाहा कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 13:29 IST

चिंच म्हटलं की, लगेच जिभेवर आंबट-गोड चव रेंगाळते. चवीला चटपटीत असणारी चिंच पदार्थाची चव वाढविण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.

चिंच म्हटलं की, लगेच जिभेवर आंबट-गोड चव रेंगाळते. चवीला चटपटीत असणारी चिंच पदार्थाची चव वाढविण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. काही लोक चिंचेच्या आंबट चवीमुळे चिंच खाणं टाळतात. पण तुम्ही एकाद्या पदार्थामध्ये एकत्र करून याचे फायदे घेऊ शकता. काही लोकांना चिंच खायला इतकं आवडतं की, ते कधी कधी चिंच कच्चीच खातात. काही लोकांना चिंचेच्या गोळ्या आवडतात, तर काही लोकांना चिंचेची चटणी आवडते. पण तुम्हाला माहीत आहे का? चिंच आरोग्यासोबत सौंदर्य वाढविण्यासाठीही फायदेशीर ठरते. 

चिंचेचे सौंदर्यासाठीचे फायदे : 

  • चिंचेमध्ये अ‍ॅन्टी-ऑक्सिडंटव्यतिरिक्त व्हिटॅमिन सी आणि ए असतं. जे स्किनला फ्री-रॅडिकल्सपासून वाचवण्याचं काम करतात. 
  • चिंच स्किनसाठी परफेक्ट ब्लीचचं काम करते आणि स्किन टोन इव्हन ठेवण्यासाठी मदत करते. 
  • चिंचेमध्ये अल्फा  हाइड्रोक्सिल अ‍ॅसिड्स असतात. जे स्किनवरील धूळ, माती, प्रदूषण दूर करतं. 
  • चिंचेमधील गुणधर्म प्रत्येक प्रकारचे डाग आणि सुरकुत्या हटवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे त्वचेचं तारूण्य जपण्यासाठी मदत होते. 

चिंचेचा फेस मास्कही फायदेशीर : 

चिंचेमध्ये असणाऱ्या गुणधर्मांचा आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही फायदा होतो. त्यासाठी दही, चंदन किंवा मुलतनी मातीसोबत एकत्र करून लावू शकता. जर तुम्हाला त्वचेचं तारूण्य टिकवयचं असेल तर तुम्ही चिंच रवा किंवा मुलतानी मातीसोबत एकत्र करून लावू शकता. 

असा तयार करा फेस मास्क : 

चिंचेचा गर काढून त्यामध्ये मुलतानी माती एकत्र करा. त्यानंतर त्यामध्ये थोडं दूध आणि गुलाब पाणी एकत्र करून व्यवस्थित एकत्र करा. आता तयार फेस पॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावा. परंतु लक्षात ठेवा हा पॅक डोळ्यांवर लावू नका. अर्धा तासासाठी असचं ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्याने तोंड स्वच्छ धुवून घ्या. ही प्रोसेस आठवड्यातून दोन वेळा करा. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स