हृदविकाराच्या रुग्सांसाठी व्हिटिमिन डी अत्यावश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 16:15 IST2016-04-06T23:15:45+5:302016-04-06T16:15:45+5:30

एका नव्या संशोधनामध्ये हृदयविकाराच्या रुग्णांच्या आरोग्यात व्हिटॅमिन-डीमुळे लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून आले.

Vitimin D is essential for heart attack rheumatism | हृदविकाराच्या रुग्सांसाठी व्हिटिमिन डी अत्यावश्यक

हृदविकाराच्या रुग्सांसाठी व्हिटिमिन डी अत्यावश्यक

ा नव्या संशोधनामध्ये हृदयविकाराच्या रुग्णांच्या आरोग्यात व्हिटॅमिन-डीमुळे लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून आले. सुमारे 163 हृदयविकाराच्या रुग्णांचा अभ्यास केला असता असे दिसून आले की, व्हिटॅमिन-डीमुळे हृदयाची रक्त पंप (रक्तभिसरण) करण्याची क्षमता वाढते. 

लिड्स टिचिंग हॉस्पीटल येथील वैज्ञानिकांनी हे संशोधन केले आहे. हाडे आणि दातांच्या मजबुतीसाठी व्हिटॅमिन-डी गरजेचे असते. शरीरातील इतर भागांतही त्यामुळे फायदा होतो परंतु अनेक लोकांमध्ये वयानुरूप व्हिटॅमिन-डीची कमतरता दिसून येते.

या संशोधनात सहभागी झालेल रुग्णाचं सरासरी वय 70 वर्षांचे होते. त्यांच्यामध्येसुद्धा व्हिटॅमिन-डीचे प्रमाण कमी होते. हृदयविकार तज्ज्ञ डॉ. क्लाऊ स विटे यांनी सांगितले की, सुर्यप्रकाश त्वचेवर पडल्यावर व्हिटॅमिन-डीची आपल्या शरीरात निर्मिती होत असते. जसजसे वय वाढत जाते तशी व्हिटॅमिन-डी निर्मितीची क्षमता घटते. यामागचे शास्त्रीय कारण अद्याप ज्ञात नाही.

संशोधनामध्ये रुग्णांना दररोज एक वर्षासाठी 100 मायक्रोग्राम व्हिटॅमिन-डी टॅब्लेट किंवा शुगर पील प्लॅसेबो देण्यात आले. तेव्हा असे लक्षात आले की, हृदयविकारामुळे कमजोर झालेल्या हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता वाढली. ब्रिटिश हार्ट फाऊंडेशनने या संशोनातील निष्कर्षांना अंचंबित करणारे म्हटले आहे.

Web Title: Vitimin D is essential for heart attack rheumatism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.