VALENTINE DAY SPECIAL : ‘व्हॅलेंटाईन्स डे’ला केस व त्वचा बनवा सुंदर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 17:32 IST2017-02-12T12:00:27+5:302017-02-12T17:32:46+5:30
‘व्हॅलेंटाईन डे’ला आकर्षक दिसून आपल्या व्हॅलेंटाईनसोबतच सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी या काही खास टिप्स....

VALENTINE DAY SPECIAL : ‘व्हॅलेंटाईन्स डे’ला केस व त्वचा बनवा सुंदर !
प्रेम व्यक्त करण्याचा दिवस ‘व्हॅलेंटाईन्स डे’ केवळ काही दिवसांवर आला आहे. यादरम्यान आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते आणि आपल्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी आपली त्वचा आणि केसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. यासाठी आपण ‘व्हॅलेंटाईन डे’ला आकर्षक दिसून आपल्या व्हॅलेंटाईनसोबतच सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी या काही खास टिप्स देत आहोत.
त्वचा :
त्वचेचा ओलावा कायम ठेवा
त्वचा कोमल व टवटवीत ठेवण्यासाठी चांगल्या दजार्चे आॅईल बेस असलेले मॉईश्चरायझर वापरा. उन्हाशी संबंध येणाºया अवयवांची विशेष काळजा घ्या. ग्लिसरीन त्वचेला कोमल ठेवण्यासाठी गुणकारी आहे. ओठांना लावण्यासाठी लिप बाम वापरा.
मृत त्वचा काढा
बाहेर गेल्यावर त्वचा टॅन होते. अंघोळ करताना लूफाच्या मदतीने शरीरावरची मृत त्वचा काढून टाका. बेसन किंवा इतर हर्बल स्क्रब वापरून तुम्ही स्क्रब करू शकता.
चांगले सनस्क्रीन वापरा
उन्हात निघण्याच्या २० मिनिटांपूर्वी सनस्क्रीन लावा. एसपीएफ १५ किंवा त्यापेक्षा जास्त असलेले सनस्क्रीन वापरा.
केस :
तेल लावा
तेलाने डोक्याला चांगल्या प्रकारे मसाज करा. रात्रभर केसांना तेल लावून ठेवा. त्यानंतर स्पा करून घ्या किंवा घरीच चांगला शॅम्पू व कंडिशनरने केस धुवा. केसांना पोषण मिळण्यासाठी असे दर आठवड्याला करा.
केसांना चांगली स्टाईल द्या
हेअर ड्रायर, फ्लॅट आयर्न किंवा कर्ल आयर्न मुळीच वापरू नका. ही सगळी साधने उष्णतेवर आधारित आहेत. यामुळे काही वेळाने तुमचे केस रूक्ष व कोरडे होतात. याऐवजी थंड ड्रायरने केस सेट करा. जर परवडणारे असेल तर व्हॅलेंटाईन्स डेच्या एक आठवडा आधी चांगल्या सलूनमध्ये जाऊन केसांची प्रोटीन ट्रिटमेंट करून घ्या.
Also Read : VALENTINE DAY SPECIAL : प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असत...!
: VALENTINE DAY SPECIAL : गिफ्ट आइडियाज !