सुंदर केसांसाठी तेलाऐवजी हे वापरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 18:07 IST2016-12-13T18:07:06+5:302016-12-13T18:07:06+5:30

विशेष समारंभप्रसंगी आपले व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा खुलून दिसावे असे प्रत्येकाला वाटते. मात्र आपण कसे दिसणार हे बहुतांश आपल्या केसांवर अवलंबून असते.

Use it instead of beautiful hair! | सुंदर केसांसाठी तेलाऐवजी हे वापरा!

सुंदर केसांसाठी तेलाऐवजी हे वापरा!

शेष समारंभप्रसंगी आपले व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा खुलून दिसावे असे प्रत्येकाला वाटते. मात्र आपण कसे दिसणार हे बहुतांश आपल्या केसांवर अवलंबून असते. त्यामुळे केसांच्या सौंदर्यासाठी आपण बऱ्याचदा महागडी उत्पादनेदेखील वापरतो. पण याऐवजी आपण घरगुती काही उपाय केल्यास आपल्या शुष्क केसांना अधिक सुंदर व मुलायम बनवू शकाल. 

दूध आणि ओट्स
केसांच्या सौंदयार्साठी केस निरोगी असणे गरजेचे आहे. केसांना दूध आणि ओट्स लावल्याने केस निरोगी होतात. केस जर फुटले असतील किंवा तुटत असतील तर दूध आणि ओट्सची पेस्ट चांगली काम करते. भांगामध्ये ही पेस्ट लावा आणि ३० मिनिटांनंतर गरम पाणी आणि मऊ शॅम्पूने धुवा. 

दही आणि अंड
केस मऊ हवे असल्यास एका अंड्याच्या पांढºया भागात २ चमचे दही घालून केसांना लावा, असे केल्याने केसातील कोंडा कमी होण्यासाठी मदत होते शिवाय केस मऊ होतात.  

मध आणि केळ 
केसांची चमक वाढविण्यासाठी आणि निरोगी होण्यासाठी मध आणि केळीचा वापर करू शकता. केळाची पेस्ट बनवून त्यामध्ये एक चमचा मध घाला. या पेस्टला केसांवर लावा आणि ३० ते ४० मिनिटानंतर मऊ शॅम्पूने धुवा. याने तुमचे केस चमकदार आणि निरोगी होतील. 

कांदा 
केसांची गळती थांबवायची असेल तर कांद्याचा वापर करु शकता. कांद्याचा रस काढून केसांना लावल्याने सर्व समस्या दूर होतात. कांद्याचा रस केसांच्या मुळाला लावून २ तासानंतर धूवून टाका. यामुळे केस गळती तर थांबेलच शिवाय त्यांची वाढही  चांगल्याप्रकारे होईल. 

Web Title: Use it instead of beautiful hair!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.