शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

चमकदार आणि मजबूत केसांसाठी स्वस्तात मस्त उपाय, आल्याचा 'असा' करा वापर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 12:50 IST

केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट वापरूनही तुम्हाला काही फायदा बघायला मिळाला नसेल तर नाराज होऊ नका.

(Image Credit : problems solutions)

केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट वापरूनही तुम्हाला काही फायदा बघायला मिळाला नसेल तर नाराज होऊ नका. इतके उपाय करून पाहिलेत मग आणखी काही उपाय करून बघायला काय हरकत आहे? याचा विचार करून आम्ही तुम्हाला आज आल्याचे केसांसाठी होणारे फायदे सांगणार आहोत. 

मजबूत आणि निरोगी केस

लांब आणि दाट केस असणं ही प्रत्येकाचीच इच्छा असते. पण खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, अनियमित आहार, तणाव आणि प्रदूषण यामुळे लांब, सुंदर आणि मजबूत केस मिळवण्याचं स्वप्न काही लोकांचंच पूर्ण होतं. आजकाल केवळ महिलाच नाही तर पुरूषांनाही केसगळतीचा सामना करावा लागत आहे. अशावेळी लोक वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सचा वापर करतात. पण काही फायदा दिसत नाही. अशात आल्याचा वापर करून तुम्ही सुंदर, लांब, मजबूत केस मिळवू शकता. 

डॅंड्रफपासून सुटका

(Image Credit : Cleveland Clinic Health Essentials)

केस वाढवण्यासाठी आल्याचा वापर करणं एक फारच सोपा आणि स्वस्त उपाय आहे. ज्या लोकांना नैसर्गिक उपायाने केस लांब आणि मजबूत करायचे आहेत, त्यांच्यासाठी डॅंड्रफ मोठा अडसर आहे. यासाठी आल्याच्या रसाने १० ते १५ मिनिटे केसांची चांगली मालिश करा. याने डॅंड्रफ पूर्णपणे दूर होतील. 

केसगळती थांबेल

आजच्या बदलत्या लाइफस्टाइलमध्ये अर्ध्यापेक्षा अधिक लोकांना केसगळतीची समस्या आहे. पण डॉक्टर म्हणतात की, दिवसातून १०० केस गळणे सामान्य बाब नाहीये. पण जर यापेक्षा जास्त केस गळत असतील तर चिंतेची बाब आहे. आलं केसांच्या मूळात घासल्याने केसांची गळती थांबते. आल्याने केसांची मालिश केल्यावर केस शॅम्पूने धुवावे.

रखरखीत केसांचा खात्मा

(Image Credit : Step To Health)

ज्या लोकांना नेहमी रखरखीत किंवा ड्राय केसांची समस्या असते त्यांच्यासाठी आलं फारच फायदेशीर ठरतं. आल्यामध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात, ज्याने त्वचेत सीबमची निर्मिती होणं रोखलं जातं. याने केस ड्राय होणं थांबतं. बाजारात तुम्हाला सहजपणे आल्याचं तेल मिळेल, हे तेल केसांना लावा.

केस होतात चमकदार

चमकदार आणि मोकळ्या केसांची इच्छा असलेल्यांनी लगेच आल्याचं सेवन करणं सुरू करावं. रोज सकाळी रिकाम्यापोटी एक आल्याचा छोटा तुकडा सेवन केल्याने केसांना नैसर्गिक चमक मिळते. तसेच आल्याच्या रसात ऑलिव्ह ऑइल मिश्रित करून लावल्यास अधिक फायदा होतो. हे मिश्रण रात्री एक तासांसाठी केसांना लावून ठेवा. त्यानंतर केस धुवा. 

टिप : वरील सर्व उपाय केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

 

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स