फेसबुकच्या वापरामुळे उत्पादकता वाढते !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2016 20:22 IST
फेसबुकचा वापर केला तर कर्मचाºयाचा थकवाही दूर होतो
फेसबुकच्या वापरामुळे उत्पादकता वाढते !
आॅफिसमध्ये काम करणारा कर्मचारी फेसबुकचा वापर करीत, असल्याचे पाहून बॉस त्यांच्यावर ओरडतात. परंतू, यामुळे उलट कंपनीची उत्पादकता वाढते. हे एका सर्व्हेमधून समोर आले आहे. आॅफीसमध्ये थोडा ब्रेक घेत फेसबुकचा वापर केला तर कर्मचाºयाचा थकवाही दूर होतो. व उत्पादकता वाढण्यासही मदत होते. त्याकरिता आपण बॉस असेल तर कर्मचाºयावर रागावू नका. या सर्व्हेमधील ३४ टक्के लोकांनी सांगितले की, काम करतांना एक मेंटल ब्रेकसाठी ते सोशल मिडीयाचा वापर करतात. प्यू रिसर्च सेंटरने अमेरिकेमध्ये २००३ युवकांवर हे संशोधन केले आहे. सर्व्हेनुसार २७ टक्के जण मित्र व क टुंबासोबत कनेक्ट राहण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर करतात. २४ टक्के प्रफेशनल कनेक्शन , २० टक्के हे माहिती होण्यासाठी कनेक्ट असतात. तर १७ टक्के हे संबंध चांगला राहावे. याकरिता ते सोशल मिडीयाचा वापर करतात.