चेहरा चमकदार बनवण्यासाठी फेसवॉशचा वापर करा; हे होतात फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 18:42 IST2018-09-04T18:41:55+5:302018-09-04T18:42:14+5:30
आपली स्किन फार सेन्सिटिव्ह असते. वातावरणातील प्रदुषण, धूळ, माती आणि सुर्याची किरणं यांमुळे त्वचेला फार नुकसान पोहोचतं. यांपासून त्वचेचा बचाव करण्यासाठी चेहरा साफ ठेवणं गरजेचं असतं.

चेहरा चमकदार बनवण्यासाठी फेसवॉशचा वापर करा; हे होतात फायदे!
आपली स्किन फार सेन्सिटिव्ह असते. वातावरणातील प्रदुषण, धूळ, माती आणि सुर्याची किरणं यांमुळे त्वचेला फार नुकसान पोहोचतं. यांपासून त्वचेचा बचाव करण्यासाठी चेहरा साफ ठेवणं गरजेचं असतं. नाहीतर कमी वयातच तुम्हच्या त्वचेवर वाढत्या वयाची लक्षणं दिसू शकतात. जर तुम्ही तुमच्या त्वचेवर उजाळा टिकवून ठेवण्यासाठी फेसवॉशचा वापर करा. त्यामुळे त्वचेला नुकसान पोहोचणार नाही. जाणून घेऊयात फेसवॉशमुळे त्वचेला होणाऱ्या फायद्यांबाबत....
1. सतत धूळ, माती आणि प्रदुषणाच्या संपर्कात राहिल्याने त्वचा निस्तेज होते. जर तुम्ही दररोज फेस वॉशने त्वचा स्वच्छ करत असाल तर तुमच्या त्वचेवरील एक्स्ट्रा ऑइल, धूळ, माती आणि प्रदुषण निघून जातं.
2. दररोज चेहर धुण्यासाठी फेस वॉशचा वापर केल्याने त्वचेचा पी एच लेव्हल स्थिर ठेवण्या मदत होते. फेस वॉश त्वचेमध्ये असलेल्या मृत पेशींना काढून टाकण्यासाठी मदत होते. ज्यामुळे त्वचा कोमल होण्यास मदत होते. तसेच यामुळे त्वचा मुलायम आणि सुंदर दिसण्यास मदत होते.
3. फेस वॉशने चेहरा धुतल्याने केवळ वातावरणातील प्रदुषणच नाही तर त्वचेच्या आतील घाण आणि मृत पेशी निघून जाण्यास मदत होते. ज्यामुळे त्वचेचं आरोग्य राखण्यास मदत होते. जर दररोज चेहरा धुण्यासाठी फेस वॉशचा वापर करत असाल तर तुम्हाला इन्स्टंट ग्लो मिळतो.