टुथपेस्ट मानवी शरीरासाठी घातक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 08:15 IST2016-02-12T15:15:17+5:302016-02-12T08:15:17+5:30
ज्या टुथपेस्टचा वापर आपण दात स्वच्छ करण्यासाठी करतो. तेच तुथपेस्ट आरोग्यासाठी हानीकारकही ठरू शकते.

टुथपेस्ट मानवी शरीरासाठी घातक
थायरॉईड : बाजारात मिळणाºया विविध कंपन्यांच्या टुथपेस्टमध्ये ‘ट्रिक्लोसॅन’ नावाचे जंतुनाशक केमिकल वापरल जाते. शास्त्रीय अभ्यासातून असे दिसून आले की, हे केमिकल थायरॉइडला निमंत्रण देणारे तसेच हृदयाच्या समस्या निर्माण करणारे आहे.
मेंदू, किडनी : काही टुथपेस्टमध्ये पॉलिथीन ग्लाइकोल्स (पॉलिथीन) नावाचा पदार्थ आढळून येतो. हे दुसरे काही नसून प्लॅस्टिकच आहे. हे जणू मानवी शरीरासाठी एकप्रकारचे विषच आहे. ज्यामुळे मेंदू, किडनी आणि हृदयालाही अपाय होऊ शकतो.
बुध्दीवर परिणाम : टुथपेस्टमध्ये आढळणाºया फ्लोराइड नावाच्या रसायनामुळे हिरड्यांना धोका होऊन दात खिळखिळे होऊ शकतात. हिरडीवर सूज येण्यासा फ्लोराइड कारणीभूत आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांच्या बुध्दीवरही याचा विपरीत परिणाम होऊन मेंदूला कमकुवत देखील करु शकतो.
हार्मोन्सचे असंतुलन : टुथपेस्टमध्ये अशा एका पदार्थाचे मिश्रण केले जाते की तो पदार्थ साबणाप्रमाणे कार्य करतो. त्याला सोडियम सल्फेट असे म्हटले जाते. यामुळे मुखाचा कर्करोग, त्वचेमध्ये तणाव आणि हार्मोन्सचे असंतुलन अशा तक्रारी होऊ शकतात.
cnxoldfiles/strong> टुथपेस्टची चव गोड करण्यासाठी मिळविला जाणारा पदार्थ सोर्बिटोलमुळे अपचन होऊ शकते. लहान वयातच अॅसिडीटी, गॅससारख्या त्रासाचा सामना करावा लागतो. तसेच अगदी तारुण्यातही या तक्रारी भेडसावू लागल्याचे दिसून येते.