चिंता घालविण्यासाठी करा हे उपाय ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 19:42 IST2016-03-30T02:42:13+5:302016-03-29T19:42:13+5:30

नोकरी, कु टुंब व प्रेम यासह अन्य कारणामुळे  चिंता ही प्रत्येकाला असतेच.

Tips to Earn Anxiety ... | चिंता घालविण्यासाठी करा हे उपाय ...

चिंता घालविण्यासाठी करा हे उपाय ...

 
्यामुळे जीवनात कुणीच कधीच आनंदी राहत नसतो.  अनेकदा त्यामुळे आपला मूडही खराब होतो. या चितेमुळे  कामामध्ये सुद्धा मन लागत नाही. तसेच भूक सुद्धा मंदावते. त्यामुळे घरी व नोकरीच्या ठिकाणीही तणावाची परिस्थती निर्माण होऊन, चिडचिडपणा येतो. 
ग्रीन टी : चिंता कमी करण्यासाठी ग्रीन टी ही खूप उपयुक्त आहे. यामुळे ब्लेड प्रेशरही कमी होऊ शकतो. आपल्याला कुठल्याही  गोष्टीची चिंता सतावत असेल तर ग्रीन टी सेवन करावे. त्यामुळे आराम मिळाल्याशिवाय राहणार नाही. 
व्यायाम : चिंता घालविण्यासाठी व्यायाम हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्याकरिता थोडा वेळ व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीराल एकप्रकारे उत्साह येतो  व आपला मूडही चांगला राहतो.
निवात बसा : चिंतेपासून मुक्ती हवी असेल तर एक जागेवर शांतपणे डोळे बंद करुन बसावे. व लांब श्वास घ्यावा. असे पाच ते सातवेळा  केल्यानंतर आराम मिळतो
चॉकलेट खावे : चिंता घालविण्यासाठी चॉक लेट ,मेवा किंवा आपल्याला आवडणारा  पदार्थ खावा. त्यामुळे सुद्धा आपली चिंता मिटू शकते.
नाश्ता करावा : संशोधनानुसार जे लोक सकाळचा नाश्ता करीत नाहीत. ते छोट्या छोट्या गोष्टीमुळे चिंतीत होतात. त्याकरिता सकाळचा नाश्ता करावा.
ओमेगा : ओमेगा ३ एसिड हा चिंता कमी करण्यासाठी खूप फायदेशी आहे. 

Web Title: Tips to Earn Anxiety ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.