यंगर लूकसाठी भुवयांची जाडी महत्त्वाची !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 16:04 IST2016-12-28T16:04:21+5:302016-12-28T16:04:21+5:30

आपले वय आपल्या चेहऱ्यावर दिसत असते. त्यासाठी चेहºयाचे सौंदर्य टिकवून ठेवणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यातच डोळ्यांवरच्या भुवयांची भूमिकादेखील उल्लेखनीय असते.

The thickness of eyeglass is important for the young look! | यंगर लूकसाठी भुवयांची जाडी महत्त्वाची !

यंगर लूकसाठी भुवयांची जाडी महत्त्वाची !

ले वय आपल्या चेहऱ्यावर दिसत असते. त्यासाठी चेहºयाचे सौंदर्य टिकवून ठेवणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यातच डोळ्यांवरच्या भुवयांची भूमिकादेखील उल्लेखनीय असते. विशेष म्हणजे जाडसर भुवया वय कमी दर्शवतात. जर आपणास यंगर लूक हवा असेल तर भुवईची जाडी जास्त ठेवावी.
 
* भुवईचा सुरुवातीचा भाग जाडसर ठेवून कमान करावी. नंतर निमुळता आकार द्यावा. नाकपुडीच्या बाहेरील भागावर ब्रशचे एक टोक ठेवून साधारणत: ४५ अंशचा कोन येईल तिथून भुवई निमुळती करावी.
* जर भुवईचे केस लांब आणि जाड असतील तर अशावेळी क्लिअर जेलचा वापर करावा. दैनंदिन मेक-अपसाठी फक्त क्लिअर जेल लावले तरी चालेल, पेन्सिल किंवा पावडर लावण्याची गरज नाही.
* पातळ भुवया असतील तर ब्लॅक पेन्सिल चुकूनही वापरू नये. खाकी किंवा ब्राऊन रंगाची पेन्सिल किंवा पावडरचा वापर करावा. रोजच्या मेकअपसाठी वॅक्स पेन्सिल योग्य राहील, लावायलाही सोपी आणि वेळही कमी लागतो.

 

Web Title: The thickness of eyeglass is important for the young look!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.