(Image Credit : Healthline)
त्वचेचा कठोरपणा जर वाढला असेल तर तुम्हाला त्वचेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्वचेवर कठोरपणा वेगवेगळ्या कारणांनी येतो. अनेकदा काही आजारांमुळे असं होतं. त्वचेचा कठोरपणा वाढल्यामुळे त्वचा निस्तेज होऊ लागते. त्वचेची काळजी जर घ्यायची असेल तर याक वेळोवेळी होणाऱ्या बदलांवर लक्ष द्यायला हवं. पण त्वचेचा कठोरपणा किंवा रखरखीतपणा का वाढतो याची कारणे जाणून घेऊया, जेणेकरुन त्यावर उपचार करण्यास सोपं जाईल.
चुकीच्या साबणाचा वापर
त्वचा कठोर होण्याचं मुख्य कारण चुकीचा साबण किंवा डिटर्जंटचा वापर असू शकतं. त्वचेचा ओलावा शोषूण घेणाऱ्या साबणाचा वापर करत असाल तर त्वचा रखरखीत होते. जर तुमची त्वचा आधीच शुष्क असेल आणि पुन्हा पुन्हा तुम्ही चेहरा व हात फेसवॉश किंवा लिक्विड सोपने धुवत असाल तर याने त्वचेवर खाज किंवा जळजळ होऊ शकते. त्यामुळे एकतर साबण बदला दुसरं असं की, भांडी घासताना हातांची काळजी घ्या.
सूर्याची किरणे
(Image Credit : StyleCaster)
जर तुमची त्वचा फार जास्त सूर्य किरणांच्या संपर्कात येत असेल तर सूर्याची प्रखर किरणे तुमच्या त्वचेचं नुकसान करू शकते. याने त्वचा फार जास्त रखरखीत होते. सूर्याची प्रखर किरणे त्वचेच्या आत जाऊन कोलेजनला प्रभावित करते. त्यामुळे त्वचा आणखी कमजोर आणि रखरखीत होते. तसेच त्वचेवर सुरकुत्या, सूज आणि रखरखीतपणा येतो. त्यामुळे नेहमी बाहेर उन्हात जाताना त्वचेवर सनस्क्रीन लावा. त्वचेला हानिकारक किरणांपासून वाचवण्यासाठी डोक्यावर टोपी वापर किंवा छत्रीचा वापर करा.
वयस्क त्वचा
सामान्यपणे चाळीस वयानंतर महिलांना जाणवायला लागतं की, त्यांची त्वचा रखरखीत होत आहे. हे होण्याचं कारण म्हणजे त्वचेचा लवचिकपणा नष्ट होत असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर त्वचा वयस्क होऊ लागते. त्यासोबतच तुम्हाला वृद्धपणाची दुसरी लक्षणेही दिसू लागतात. जसे की, त्वचेवर बारीक रेषा, सुरकुत्या. इतकेच काय तर तेलकट त्वचेच्या महिलांना सुद्धा त्वचा रखरखीत होण्याची समस्या होते. अशावेळी तज्ज्ञांच्या मदतीने योग्य उत्पादनांचा वापर करावा.
त्वचेची समस्या
सोरायसिस आणि एक्जिमासारख्या आजारांचा वाईट प्रभाव रखरखीत त्वचा असलेल्यांवर अधिक होतो. जर तुम्हाला त्वचेवर फार जास्त खाज आणि वेदना होत असतील. किंवा त्वचेवर लाल डाग असतील तर तुम्ही सोरायसिसने पीडित असू शकता. एक्जिमा वेगवेगळ्या वेळी वेगळ्या लक्षणांसोबत डोकं वर काढतो. त्यामुळे अशा काही समस्या असतील तर वेळीट डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
गरम पाण्याने आंघोळ
जर तुम्ही फार जास्त गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर तुमची त्वचा रखरखीत होऊ शकते. गरम पाण्यामुळे त्वचेची वरचा भाग प्रभावित होतो. त्वचेच्या या वरच्या भागात त्वचेचा ओलावा कायम ठेवण्यासाठी काही तत्व असतात. पण गरम पाणी आणि साबणामुळे त्वचा रखरखीत होते. त्यामुळे फार जास्त गरम पाण्याने आघोंळ करू नये.