​चहा प्यायचा नाही तर चघळायचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 03:28 IST2016-03-01T10:28:13+5:302016-03-01T03:28:13+5:30

जर्मनीच्या काही भागातील लोक चहा पिण्याऐवजी ‘व्हाईट टी लिफ’ चघळतात.

Tea do not want to drink tea! | ​चहा प्यायचा नाही तर चघळायचा!

​चहा प्यायचा नाही तर चघळायचा!

चून आश्चर्यचकित झाला ना? चहा तर प्यायची गोष्ट आहे. तो काय चघळत बसायचा का? अहो पण हे संशोधक लोक काय करतील याचा काही नेम नाही.

चहा पिल्याशिवाय तर अनेकांची सकाळच होत नाही. आपल्या दैनंदिन जीवनात चहाला अढळ स्थान आणि महत्त्व आहे. पण आता चहा पिण्याला चहा चघळण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

जर्मनीच्या काही भागातील लोक चहा पिण्याऐवजी ‘व्हाईट टी लिफ’ चघळतात. आपल्याकडे जसे लोक पान मसाला खातात, तसे तेथील लोक चहाची पाने खातात.

ऊटीमधील डोडाबेट्टा टी फॅक्टरी आणि टी म्युझियमचे सरव्यवस्थापक एल. वरदराज यांनी सांगितले की, पानमसाल्याप्रमाणे जर्मनीतील लोक चहाची पाने रिफ्रेशमेंट म्हणून चघळतात. हळूहळू हा ट्रेंड वाढत आहे. सध्या मार्केटमध्ये व्हाईट टी लिफची किंमत खूप महाग आहे. परंतु ही चहाची पाने कोणत्याही प्रक्रिया केल्याशिवाय खाल्ली जातात म्हणून त्यांच्यामध्ये अँटी-आॅक्सिडंटचे प्रमाणही खूप जास्त असते.

white tea

काही तज्ज्ञ व्हाईट टी लिफला ग्रीन टीपेक्षा जास्त आरोग्य लाभदायक मानतात. ते चहाच्या पानांऐवजी देठापासून तयार केली जातात. सिगारेट ओढणाऱ्यासाठी तर अधिकच फायदेशीर आहे कारण त्यामुळे निकोटीने दूष्परिणाम कमी होतात.

Web Title: Tea do not want to drink tea!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.