ब्लड ग्रुपनुसार घ्या चहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 04:55 IST2016-03-03T11:55:14+5:302016-03-03T04:55:14+5:30
रक्त गटानुसार ही चहा प्यायला हवा असं एका संशोधनात समोर आलंय.

ब्लड ग्रुपनुसार घ्या चहा
'ए' ब्लड ग्रुप : 'ए' ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींनी ग्रीन टी, मेरीगोल्ड टी, ओवा टी आणि चमेलीच्या झाडाच्या चहाचे सेवन करावे.
'बी' ब्लड ग्रुप : 'बी' ब्लड ग्रुपच्या लोकांनी लेमन बाम टी, तेजपत्ताची चहा, एल्डरबेरी टी, रुइबोस टी, रेड टी आणि ग्रीन टी सेवन केली पाहिजे.
'एबी' ब्लड ग्रुप : या ब्लड ग्रुपच्या व्यक्तींनी कॉफी न घेता चहा प्यायला पाहिजे. या लोकांनी पुदीना, लेवेंडर फूल, ग्रीन टी आणि येलो टी घ्यायला हवी.
'ओ' ब्लड ग्रुप : ओ ब्लड ग्रुप असलेले लोक अॅसिडीटी आणि अपचनाच्या समस्येने त्रस्त असतात. कॉफी न घेता चहा घ्यावा. अदरक, जिनसेंग टी, येरबा मेट टी आणि ग्रीन टी घेणे फायदेशीर असते.