उन्हाळ्यातील थकवा घालविण्यासाठी ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 19:25 IST2016-03-28T02:25:25+5:302016-03-27T19:25:25+5:30

उन्हाळ्यात  आपल्याला खूप थकवा येतो. कामामध्ये आपले मन लागत नाही.

To take the summer fatigue ... | उन्हाळ्यातील थकवा घालविण्यासाठी ...

उन्हाळ्यातील थकवा घालविण्यासाठी ...

 
ाकरिता घरी बसून काही फळांचे सेवन केले तर त्यामुळे आपला थकवा व आळसही  हमखास दूर होतो. कोणकोणत्या फळांमुळे थकवा जातो व ऊर्जा वाढते त्याची ही माहिती.
पाणी पिणे : उन्हाळ्याच्या दिवसात जादा पाणी पिणे हे खूप फायदेशीर आहे. आपल्याला जर आळस आलेला असेल तर थोड्या थोड्या वेळाने पाणी पित राहावे. यामुळे आपल्या शरीरात उत्साह येईल. दिवसाची सुरुवात ही दोन ग्लास पाण्याने करावी. परंतु, खाली पोट असेल तर जादा पाणीही पिणेही चांगले नाही हे सुद्धा लक्षात घ्यावे. 
केळी : गरमीच्या दिवसात केळी खाणे हे खूप फायदेशीर आहे. त्यामुळे शरीरातील शुगर नियंत्रीत राहते व प्रचन प्रक्रिया चांगली राहते. त्यामध्ये असणाºया पोटोशिअम व व्हिटामीन बी च्या प्रमाणामुळे आपल्या शरीरात ऊर्जा येते. 
आद्रक  चहा : शरीरातील प्रतिरोधक क्षमता वाढविण्यासाठी आद्रके ची चहा सुद्धा खूप उपयोगाची आहे. त्यामुळे शरीराला आराम मिळतो. त्यामधील एंटीआॅक्सिडेंट मुळे आपल्याला नेहमी ताजेतवाणे असल्याचे जाणवते.
बदाम : शरीर चांगले राहण्यासाठी पोषक तत्वाची खूप आवश्यकता असते. पोषक तत्वासाठी बदामाचे सेवन करणे हे कधीही योग्य आहे. त्यामधील प्रोटीनमुळे शरीराला चांगली ऊर्जा मिळते. 
े नारळ : आपल्याला जेव्हा जास्त आळस आलेला असेल तर अशावेळेला कच्चे नारळ खावे. किंवा त्याचे पाणी तरी प्यावे. संपूर्ण कच्चे नारळ खाल्ले तर पोटातील गरमीही कमी होते.
कच्चे फळे : आळस घालविण्यासाठी संत्री, द्राक्षे व लिंबू ही कच्ची फळे खाणे  खूप फायदाचे आहेत. ही फळे शरीरातील प्रतिकार शक्ती वाढविण्याचे काम करतात. उत्साह येण्यासाठी नेहमी या फळांचे सेवन करणे उत्तम आहे. 
अन्न धान्य : गहू, तांदूळ व मुग या धान्याचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे आळसही दूर होतो व शरीराला ऊर्जाही मिळते. 

Web Title: To take the summer fatigue ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.