Summer homemade face pack with rose water | गुलाबपाणी वापरून तयार करा फेसपॅक; फ्रेश लूक मिळवण्यासाठी होईल मदत!
गुलाबपाणी वापरून तयार करा फेसपॅक; फ्रेश लूक मिळवण्यासाठी होईल मदत!

उन्हाळ्यामध्ये त्वचेच्या अनेक समस्याचा सामना करावा लागतो. अशातच डोक्यावर तळपणारा सूर्य अगदी हैराण करून सोडतो. या वातावरणात धूळ, उन आणि प्रदूषणापासून बचाव करणं फार अवघड होतं. अशातच गुलाब पाणी आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. गुलाब पाण्याच्या मदतीने तुम्ही अनेक फेसपॅख तयार करू शकता. ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या त्वचेला कोणत्याही वातावरणात फ्रेश ठेवू शकता. 

जाणून घेऊया गुलाबपाण्याने तयार करण्यात येणाऱ्या फेस फॅक्सबाबत, जे तुम्हाला उन्हाळ्यातही फ्रेश लूक देण्यासाठी मदत करतात. 

गुलाबपाणी आणि बेसन 

बेसन त्वचा उजळवण्यासाठी एक नॅचरल प्रोडक्ट आहे. गुलाबपाणी आणि बेसनाचा फेसपॅक उन्हाळ्यामध्ये तुमची स्किन हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतं. हा फेस पॅक तयार करण्यासाठी एक चमचा बेसन आणि एक चमचा गुलाब पाणी एकत्र करा. हे व्यवस्थित एकत्र करून एक स्मूद पेस्ट तयार करा. हा फेसपॅक चहऱ्यावर लावून जवळपास 15 त 20 मिनिटांसाठी तसचं ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून टाका. आठवड्यातून एकदा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. 

गुलाबपाणी आणि मध

एका बाउलमध्ये थोडंसं गुलाबपाणी घ्या. त्यानंतर त्यामध्ये मध एकत्र करून आपला चेहरा आणि गळाला लावून 20 मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर पाण्याने धुवून टाका. उत्तम रिझल्टसाठी हा पॅक आठवड्यातून दोन वेळा लावा. 

गुलाबपाणी आणि टॉमेटो 

गुलाबपाणी आणि टॉमेटोच्या फेसपॅकचा वापर ऑयली स्किनपासून सुटका करण्यासाठी करण्यात येतो. टॉमेटोमध्ये अॅन्टीऑक्सिडंट  प्रॉपर्टीज असतात. जे त्वचेवरील ऑइल हटवण्यासाठी मदत करतात. एक चमचा गुलाबपाण्यामध्ये एक चमचा टॉमेटोचा ज्यूस एकत्र करा. कॉटन बॉल्सच्या मदतीने हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावून 20 मिनिटांसाठी तसचं ठेवा. त्यानंतर हे स्वच्छ करून थंड पाण्याने धुवून घ्या. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.


Web Title: Summer homemade face pack with rose water
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.