हृदयरोगावर स्टेम सेल थेरपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2016 16:50 IST2016-04-09T23:50:06+5:302016-04-09T16:50:06+5:30

स्टेम सेल थेरपीने उपचार झालेल्या हृदयरोगाच्या रुग्णांना पुन्हा हृदयविकाराची समस्या उद्भवण्याची शक्यता कमी असते.

Stem Cell Therapy in Heart Disease | हृदयरोगावर स्टेम सेल थेरपी

हृदयरोगावर स्टेम सेल थेरपी

दय बंद पडेण, हृदयाचा झटका असे आजार दिवसेंदिवस बळावत चालले आहेत. हृदयरोगाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा रुग्णांसाठी एक चांगली बातमी आहे.

नव्या रिसर्चनुसार स्टेम सेल थेरपीने उपचार झालेल्या हृदयरोगाच्या रुग्णांना पुन्हा हृदयविकाराची समस्या उद्भवण्याची शक्यता कमी असते.

प्लॅसेबो-कंट्रोल्डच्या तुलनेत बोन मॅरोतील स्टेम सेलने उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये पुन्हा हृदयासंबंधी समस्या येण्याचे प्रमाण 37 टक्क्यांनी कमी आढळून आले.

अमेरिकेतील उटाह विद्यापीठातील भारतीय वंशाचे संशोधक अमित पटेल यांनी सांगितले की, गेली 15 वर्षांपासून स्टेम सेल थेरपीवर अध्ययन सुरू होते. परंतु आमच्या संशोधनातून त्याची उपयुक्तता अधोरेखित झाली आहे.

हृदय रोगाच्या शेवटच्या स्टेजमध्ये असणाऱ्या 126 रुग्णांवर  रँडमली प्लॅसबो किंवा स्टेम सेल थेरपीने उपचार करण्यात आले. प्रत्येक रुग्णाचा थोड्या प्रमाणात बोन मॅरो घेण्यात आला आणि मेसेंच्यमल सेल आणि एम-2 मॅक्रोफेजेस हे दोन स्टेम सेल निवडण्यात आले.

त्यानंतर ‘आयक्समिएलोसेल-टी’ नावााची मल्टीसेल्युलर थेरपी करण्यात आली. 3-डी इलेक्ट्रोकेमिकल तंत्राने हृदयात बिघाड झालेला भागाचा शोध घेऊन थेट तेथेच या सेलचे रोपण करण्यात आले.

Web Title: Stem Cell Therapy in Heart Disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.