शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

केस विंचरण्यासाठी 'हा' कंगवा वापरणं असतं फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 18:22 IST

केसांना हेल्दी ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. काहीजणं तर डॉक्टरांचाही सल्ला घेतात. पण अशातच आपण एका गोष्टीकडे दुर्लक्ष करतो.

केसांना हेल्दी ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. काहीजणं तर डॉक्टरांचाही सल्ला घेतात. पण अशातच आपण एका गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. ती म्हणजे आपण केस विंचरण्यासाठी ज्या प्लॅस्टिकच्या कंगव्याचा वापर करतो त्याबाबत. केसांचं आरोग्य राखण्यासाठी योग्य कंगवा वापरणं गरजेचं असतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्लॅस्टिकऐवजी लाकडाच्या कंगव्याने केस विंचरणं फायदेशीर आहे. प्लॅस्टिकमध्ये असलेले केमिकल्स केसांना नुकसान पोहचवू शकतात. त्यामुळे लाकडाच्या कंगव्याने केस विंचरणं केसांचं आरोग्या राखण्यासाठी उत्तम पर्याय आहे. लाकडाचा कंगवा अॅन्टी-सेफ्टीक असण्यासोबतच नॉन-टॉक्सिक असतात. यामुळे केसांना आणि डोक्याच्या त्वचेला फायदा होतो. 

लाकडाच्या कंगव्याचे फायदे -

- हेअर फॉलिकल्सचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं. ज्यामुळे डोक्याच्या त्वचेचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. 

- केसांचा गुंता होणं कमी होतं. 

- केस दुभंगण्याच्या समस्येपासून सुटका होते. 

- कुरळ्या केसांचा गुंता पटकन होतो, पण साकडाचा कंगरवा वापरल्यामुळे गुंता लवकर सोडवण्यास मदत होते. 

- केसांचं गळणं आणि केस तुटण्याची समस्या कमी होते. 

- डोक्याच्या त्वचेला कमी नुकसान होतं. 

केस सारखे विंचरल्यामुळेही केसांना फार नुकसान पोहोचतं. त्यामुळे ठराविक काळानंतरच केस विंचरावे. जास्त केस विंचरल्यामुळे केसांमध्ये ड्रायनेस येतो मात्र डोक्याची त्वचा तेलकट होते. तेच कमी वेळा केस विंचरल्यामुळे केस तुटण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे केस विंचरताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. दिवसातून 3 ते 8 वेळाच केस विंचरावे. त्यामुळे केसांना कमीत कमी नुकसान पोहोचतं. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सWomenमहिला