थोेडा वेळ उभे राहणे फायद्याचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 05:10 IST2016-03-01T12:10:06+5:302016-03-01T05:10:06+5:30
धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे. तसेच दिवसभर एकाच स्थितीत बसून दीर्घकाळ काम करणेही आरोग्यासाठी जास्त हानिकारक आहे, असे विशेष तज्ज्ञ म्हणतात

थोेडा वेळ उभे राहणे फायद्याचे
1 लाख 20 हजार लोकांवर अभ्यास क रून अमेरिकन कॅन्सर सोसायटीने सिद्ध केले आहे. अमेरिकन संशोधकांच्या माहितीनुसार, सतत सहा तास बसून काम केल्याने मधुमेह, लठ्ठपणा, हृदयरोग, कर्करोग या समस्यांचा धोका वाढतो.
या समस्या स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळतात. एखादे काम सतत बसून आणि कोणतीही हालचाल न करता केल्यास सामान्यपणे रक्ताभिसरण होत नाही. चालणे शक्य नसेल तर आहे त्या ठिकाणी उभे राहिलात तरीही चांगले आहे.
उभे राहिल्यानेही रक्ताभिसरण सुधारते. शरीराला चालना मिळते. आपण उभे राहतो तेव्हा आपले वजन गुडघ्यांवर पडणार नाही आणि आपल्याला व्यवस्थितही वाटेल याची काळजी घ्या. आॅफिसमध्ये असताना काही वेळ उभे राहून करण्याचा फायदाच आहे.