हिवाळ्यात लावा पालकाचा 'हा' खास फेस मास्क; मग बघा कमाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 10:15 AM2019-11-13T10:15:13+5:302019-11-13T10:24:42+5:30

हिवाळा आला की, आरोग्यासोबतच त्वचेची काळजी अधिक प्रमाणात घ्यावी लागते. तसेच या दिवसात पालेभाज्या खाण्याचाही सल्ला आवर्जून दिला जातो.

Spinach or Palak face pack for all skin types | हिवाळ्यात लावा पालकाचा 'हा' खास फेस मास्क; मग बघा कमाल...

हिवाळ्यात लावा पालकाचा 'हा' खास फेस मास्क; मग बघा कमाल...

Next

(Image Credit : boldsky.com)

हिवाळा आला की, आरोग्यासोबतच त्वचेची काळजी अधिक प्रमाणात घ्यावी लागते. तसेच या दिवसात पालेभाज्या खाण्याचाही सल्ला आवर्जून दिला जातो. यात खासकरून पालकाची भाजी खाण्याचा सल्लाही दिला जातो. या दिवसात पालकाची भाजी खाणे जेवढी आरोग्यासाठी चांगली असते, तेवढीच त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. पालकमधे आयर्न, व्हिटॅमिन ए, फोलेट, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशिअम, फायबर आणि प्लांट प्रोटीन असतात. जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. हा मास्क कसा तयार कराल यासाठी खालील व्हिडीओ बघा...

पालक भाजीमध्ये असे तत्व असतात जे त्वचेवरील डाग दूर करतात. त्यासोबतच याने कोलेजनच्या निर्मितीतही मदत मिळते. ज्यामुळे त्वचा मुलायम आणि ग्लोईंग होते. इतकेच नाही तर त्वचेवरील सुरकुत्या आणि फाइन लाईन्सही दूर करण्यास याने मदत मिळते. तसेच पालक पिंपल्स आणि त्वचेवरील इतरही समस्या दूर करण्यास मदत करते. 

मग आता जर पालक त्वचेसाठी इतकी फायदेशीर आहे, तर पालक भाजी खाण्यासोबत याचा मास्कही का वापरू नये? चला जाणून घेऊ पालकाच्या फेस मास्क बाबत....

कसा कराल तयार?

पालकाचा फेस मास्क तयार करण्यासाठी फार जास्त काही लागत नाही. केवळ १ वाटी पालकाच्या पेस्टमध्ये २ चमचे बेसन, अर्धा चमका हळद, एका लिंबाचा रस आणि काही थेंब मध यात टाका. आता हा पॅक संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावा आणि अर्धा तास तसाच राहू द्या. त्यासोबतच चेहऱ्यावर हलक्या हाताने ५ ते १० मिनिटे मसाज करा. नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवावा. 


Web Title: Spinach or Palak face pack for all skin types

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.