सोशल अ‍ॅक्टिव्ह असणे झोपेसाठी लाभदायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 05:32 IST2016-03-03T12:32:48+5:302016-03-03T05:32:48+5:30

 दैनंदिन जीवनात सतत सोशल अ‍ॅक्टिव्हिटिज्मध्ये गुंतून ठेवल्यामुहे झोप चांगली लागते. 

Social activation is beneficial for sleeping | सोशल अ‍ॅक्टिव्ह असणे झोपेसाठी लाभदायक

सोशल अ‍ॅक्टिव्ह असणे झोपेसाठी लाभदायक

ार वयामध्ये झोप न येणाची समस्या फार कॉमन आहे. यावर उपाय म्हणजे तुमची सोशल लाईफ थोडी वाढवा आणि पाहा रात्री कशी शांत झोप लागते. एका नव्या स्टडीनुसार दैनंदिन जीवनात सतत सोशल अ‍ॅक्टिव्हिटिज्मध्ये गुंतून ठेवल्यामुहे झोप चांगली लागते. 

मित्रांसोबत गप्पा मारणे, संध्याकाळी बाहेर फिरायला जाणे आणि विशेष करून धार्मिक कार्यात सहभागी होणे अशा गोष्टींमुळे झोप न येणाची समस्या सुटू शकते. मिसूरी विद्यापीठातील सहप्राध्यापिका जेन-हाओ चेन यांनी सांगितले की, आपला सामाजिक वावर आणि आरोग्य यांचा फार घनिष्ठ संबंध आहे.

मित्रांशी असणारी जवळीकता, समाजात मिळणारा सन्मान यांमुळे वृद्धपकाळात आरोग्य चांगले राहते. ‘नॅशनल सोशल लाईफ लाईफ, हेल्थ अँड एजिंग प्रोजेक्ट’ने पाच वर्षांच्या काळात जमा केलेल्या माहितीचे विश्लेषण करून उपरोक्त निष्कर्ष काढण्यात आला.

girlfriends

सामाजिक कार्यात सहभाग (जसे, स्वयंसेवक, धार्मिक कार्यात सहभाग, सोशल क्लबमध्ये काम) आणि झोपेचा कसा संबंध आहे यांचा चेन यांनी शोध घेतला. झोपेचा काळ चेन यांनी ‘अ‍ॅक्टिग्राफी’ हातावर घालायच्या स्लीप ट्रॅकरद्वारे मोजला.

Web Title: Social activation is beneficial for sleeping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.