SMART TIPS : ​पुरुषांनो, चेहऱ्यावरील ‘ब्लॅकहेड ’असे करा दूर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2017 17:46 IST2017-03-25T12:06:49+5:302017-03-25T17:46:26+5:30

महिलांना ज्याप्रमाणे चेहऱ्यावरील ब्लॅकहेडची समस्या सतावते, त्याप्रमाणेच पुरुषांनाही ही समस्या जाणवते. तर पुरुषांनी ही समस्या सोडविण्यासाठी काय उपाय योजना करावी, याबाबत जाणून घेऊया.

SMART TIPS: Men, make the 'Blackhead' on the face! | SMART TIPS : ​पुरुषांनो, चेहऱ्यावरील ‘ब्लॅकहेड ’असे करा दूर !

SMART TIPS : ​पुरुषांनो, चेहऱ्यावरील ‘ब्लॅकहेड ’असे करा दूर !

ong>-Ravindra More
महिलांना ज्याप्रमाणे चेहऱ्यावरील ब्लॅकहेडची समस्या सतावते, त्याप्रमाणेच पुरुषांनाही ही समस्या जाणवते. तर पुरुषांनी ही समस्या सोडविण्यासाठी काय उपाय योजना करावी, याबाबत जाणून घेऊया. 



लिंबू
 लिंबात ब्लॅकहेड नष्ट करण्याची ताकद असते. यात मोठ्या प्रमाणात असलेल्या सायट्रिक अ‍ॅसिडमुळे त्वचेचा तेलकटपणा कमी होऊन ब्लॅकहेड सुकून जातात. मिठात काही थेंब लिंबाचा रस टाकून हे मिश्रण ब्लॅकहेड असलेल्या भागात लावा आणि वीस मिनिटांनंतर चेहरा धुवा. अपायकारक सौंदर्यप्रसाधनांना दूर ठेवून या नैसर्गिक घटकांच्या साहाय्याने तुम्ही ब्लॅकहेड हटवू शकता.



टोमॅटो
यातील नैसर्गिक जीवाणूप्रतिबंधक घटकांमुळे ब्लॅकहेड सुकून जातात. यासाठी तुम्ही टोमॅटोचे मिश्रण तयार करून चेहऱ्यावर रात्री लावा आणि सकाळी तुमच्या चेहरा पाण्याने धुवा. तुमची त्वचा सकाळी तजेलदार आणि स्वच्छ दिसेल.
 


जायफळ व दूध 
जायफळ आणि दूध यांचे मिश्रण करून त्याचा वापर ब्लॅकहेड नष्ट करण्यासाठी करू शकता. चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर करून जायफळातील खरबरीतपणामुळे तुमची त्वचा मऊ आणि सुंदर होते. दुधात असलेल्या लॅक्टिक अ‍ॅसिडमुळे त्वचेवरील तेलाच्या पेशी निघून जातात.

Web Title: SMART TIPS: Men, make the 'Blackhead' on the face!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.