खरबूजाच्या सेवनाने त्वचा होते सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 20:10 IST2016-03-24T03:10:17+5:302016-03-23T20:10:17+5:30

उन्हाळ्याच्या  दिवसात येणारे कोणतेही फळ प्रत्येकाला आवडल्याशिवाय राहत नाही.

The skin of the melon consumed was beautiful | खरबूजाच्या सेवनाने त्वचा होते सुंदर

खरबूजाच्या सेवनाने त्वचा होते सुंदर

यातील  खरबूज हे आपल्याला कुठेही दिसून येते. ते स्वादिष्ट व  खाण्यासाठी फारच उपयुक्त असून, त्यामुळे कितीही गरमीमध्ये थंड वाटायला लागते. खरबूज हे खूप फायदेशीर व गुणकारी आहे. शरीराचे वजन घटण्यापासून ते गर्भवती महिलेसाठीही ते फायदेशीर आहे. त्याचबरोबर सौंदर्यसाठी ते उपयुक्त असून, खरबूज हे  त्वचेला कसे सुुंदर बनविते त्याची ही माहिती.
व्हिटामीनचे प्रमाण वाढते : आपण जर खरबुजाचे सेवन करीत असलो तर शरीरात व्हिटामीनचे प्रमाण वाटते. त्यामुळे आपली त्वचा नेहमी चांगली राहते.
त्वचेला येते चमक : खरबूजामध्ये पाणी हे मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे त्वचामध्ये कधीही पाण्याचा कमतरता जाणवत नाही. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थही बाहेर पडतात. त्यामध्ये व्हिटामीन बी चे सुद्धा प्रमाण असते. त्याचबरोबर बेटाइन व कोलाइनही असते. याची आपण फ्रूट मसाजही करु शकता. त्यामुळे त्वचेला चमक येते.
चेहरा खुलवते : खुरबूजामध्ये व्हिटामीनचे ए व सी चे सुद्धा प्रमाण असते. खरबूज व दही मिक्स करुन १० मिनीटे चेहºयावर लावावे. त्यामुळे चेहºयावर चमक आल्याशिवाय राहत नाही.
झुरळ्या येत नाही : चेहºयावर येणाºया झुरळ्या सुद्धा खरबूज सेवनामुळे येत नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी तरुण वाटतात.
त्वचा रोगलाही असरदार : खरबुजाचे सेवन व त्याचा लेप लावल्याने त्वचा रोगही नाहीसा होतो. तसेच त्वचेला जळाल्याने असलेल्या ओळखणी ते घालविते.

Web Title: The skin of the melon consumed was beautiful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.