शरीराच्या 'या' भागांवर सगळ्यात आधी दिसतात वयवाढीच्या खुणा; त्वचेची 'अशी' घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 05:28 PM2020-09-02T17:28:32+5:302020-09-02T17:45:15+5:30

आपल्या त्वचेवरील वयवाढीच्या खुणा लपवण्याकरीता लोक महागड्या क्रिम्सचा वापर करतात. जसंजसं वय वाढतं तसंतसं त्वचेवर खुणा दिसायला सुरूवात होते.

Skin Care Tips Marathi : 5 body parts that reveal your age first | शरीराच्या 'या' भागांवर सगळ्यात आधी दिसतात वयवाढीच्या खुणा; त्वचेची 'अशी' घ्या काळजी

शरीराच्या 'या' भागांवर सगळ्यात आधी दिसतात वयवाढीच्या खुणा; त्वचेची 'अशी' घ्या काळजी

Next

कोणालाही वयाआधीच म्हातारं दिसावसं वाटतं नसतं. आपण आपल्या वयापेक्षा काही वर्षांनी लहान दिसावं असं सगळ्यांनाच वाटतं. आपल्या त्वचेवरील वयवाढीच्या खुणा लपवण्याकरीता लोक महागड्या क्रिम्सचा वापर करतात. जसंजसं वय वाढतं तसंतसं त्वचेवर खुणा दिसायला सुरूवात होते. आज आम्ही तुम्हाला शरीराच्या कोणत्या भागावर सुरकुत्या आणि वयवाढीच्या खुणा सगळ्यात आधी दिसतात याबाबत सांगणार आहोत.
त्वचेवर २० वर्षानंतर कोलोजनचं उत्पादन कमी  प्रमाणात होतं. त्यामुळे त्वचेतील मुलायमपणा कमी होतो. जे लोक जास्तवेळ उन्हात काम करतात, आहार व्यवस्थित घेत नाहीत. ज्यांच्या शरीरात हार्मोनल बदल जलदगतीनं होतात त्यांच्या शरीरावर सुरकुत्या खूप लवकर येतात. 

कपाळ

कपाळावर सुरकुत्या सगळ्यात आधी यायला सुरूवात होते. रेटिनॉलयुक्त उत्पादन सुरकुत्यांना कमी करून कोलोजनचं प्रमाण वाढतात. यामुळे त्वचा चमकदार आणि सॉफ्ट होते. त्वचेतील मृतपेशी निघून जाण्यास मदत होते. त्वचेला नेहमी तरूण ठेवण्यासाठी रात्री फेशियल नाइट क्रिम लावून झोपा. मादक पदार्थांचे सेवन करून नका, स्मोकिंग करणं टाळा, जास्तीत जास्त पाणी प्या. हिरव्या भाज्यांचे सेवन करा. 

पापण्या

वाढत्या वयात पापण्यांवर सुरकुत्या यायला सुरूवात होते. त्यामुळे मासपेशी कमजोर होतात आणि पापण्यांची त्वचा लोमकळू लागते.  डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेला चांगले ठेवण्यासाठी टी बॅग्सचा वापर करा. त्यामुळे डोळ्यांचा ड्रायनेस कमी होण्यास मदत होईल. चांगल्या क्वालिटीचे मॉईश्चराईजिंग क्रिम किंवा आयक्रिमचा वापर करा. 

मान

मानेची त्वचा चेहऱ्याच्या त्वचेच्या तुलनेत खूप पातळ असते. मानेसह शरीराच्या इतर भागांवर सुरकुत्या यायला सुरूवात होते. तुमचं वय ३० वर्षांच्या आसपास असेल तर त्वचेवर घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही सौंदर्याची काळजी  घेऊ शकता. बटाट्याचा रस,  बेसन आणि दुधाचा फेसफॅक लावून त्वचेला चांगले ठेवता येईल. 

हात

हात नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींच्या संपर्कात येत असतो. हाताला २० वर्षानंतर सुरकुत्या दिसायला सुरूवात होते. सुर्याच्या युव्ही रेजमुळे त्वचेला नुकसान पोहोचतं म्हणून कुठेही बाहेर जाताना हाताना सनस्क्रिन किंवा  मॉईश्चराईजर लावून जा. तुमच्या हातांमध्ये जितका सॉफ्टनेस असेल तितकेच तुमचे हात चांगले दिसतील. 

ओठ

वाढत्या वयात ओठांवरही वय वाढण्याच्या खुणा दिसून  येतात. ओठांवर बारिक बारिक रेषा येतात. या रेषांमुळे त्वचा काळपट होते. त्यामुळे त्वचेवर कोरडेपणा येतो. त्वचेवर तेलाचं उत्पादन कमी होतं. ओठांना दीर्घकाळ चांगलं ठेवायचं असेल तर रात्री झोपण्याआधी ओठांना तूप लावून झोपा.  ज्यामुळे तुमचे ओठ नेहमी सॉफ्ट राहतील. 

हे पण वाचा-

चेहऱ्यावरील डाग आणि पिगमेंटेशन झटपट दूर करण्यासाठी 'चारोळीचा' असा करा वापर

हिवाळ्यात कोरोनाचं रौद्र रुप दिसणार; या देशात ८५ हजार मृत्यू होणार, सरकारी रिपोर्टमधून खुलासा

तुम्हीसुद्धा रिकाम्यापोटी दूध पिता का? मग निरोगी राहण्यासाठी 'या' चूका करणं टाळा

Web Title: Skin Care Tips Marathi : 5 body parts that reveal your age first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.