उपवास ठेवताना विचार करावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:10 IST2016-01-16T01:17:49+5:302016-02-06T10:10:39+5:30
उपवास करणे ही तशी आरोग्यासाठी चांगली गोष्ट आहे. मात्र मधुमेह व उच्च रक्तदाब रुग्ण असेल त्यांनी आधी विचार करावा...

उपवास ठेवताना विचार करावा
उ वास शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवता येते. मात्र जर कोणी मधूमेह (डायबिटीज) आणि उच्च रक्तदाब (हाय ब्लडप्रेशर)चा रुग्ण असेल तर उपवास ठेवताना त्याने थोडा विचार करायला हवा. अशा व्यक्तींना उपवास करण्याआधी आपल्या डॉक्टरांकडूनदेखील आवश्य सल्ला घ्यायला हवा. ज्यांची साखर अनियंत्रित राहते त्यांनी उपवास करू नये. जे आहार आणि व्यायाम यांचे संतुलन व्यवस्थित ठेवतात, अशा मधुमेहाच्या रुग्णांना उपवासाशी संबंधीत धोके कमी असतात. त्यामुळे असे व्यक्ती उपवास करू शकतात. जे औषधीद्वारे साखर नियंत्रणात ठेवतात ते देखील नवरात्रीचे उपवास ठेऊ शकतात. मधुमेहाच्या रुग्णांना उच्च रक्तदाब तसेच जुलाबचा धोका असतो, त्यामुळे त्यांनी उपवासात नारळ पाणी, निंबू पाणी, लस्सी घेतली पाहिजे. नवरात्रात अनेकजण मीठ वर्ज्य करतात. आठ-नऊ दिवस मीठाशिवाय राहिल्यास थकवा जाणवतो आणि रक्तदाब कमी होतो. त्यामुळे याकाळात सेंधी मीठ सेवन करता येईल.