​‘इअर कफ्स’ देतील वेगळेपणा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 18:25 IST2017-01-12T18:24:10+5:302017-01-12T18:25:14+5:30

फॅशनच्या जगात स्टायलिश राहायला कुणाला आवडणार नाही. यासाठीच मार्केटमध्ये विविध प्रकारच्या अ‍ॅक्सेसरीज पाहावयास मिळतात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे ‘इअर कफ्स’ होय.

Separation of 'Year Cafés'! | ​‘इअर कफ्स’ देतील वेगळेपणा !

​‘इअर कफ्स’ देतील वेगळेपणा !

ong>-रवीन्द्र मोरे 

फॅशनच्या जगात स्टायलिश राहायला कुणाला आवडणार नाही. यासाठीच मार्केटमध्ये विविध प्रकारच्या अ‍ॅक्सेसरीज पाहावयास मिळतात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे ‘इअर कफ्स’ होय. म्हणून कुठल्याही समारंभात तुम्हाला गर्दीपासून वेगळे दिसायचे असेल तर तुमच्या कलेक्शनमध्ये इअर कफ्स असायलाच हवे. यासाठी आम्ही आपणास हटके दिसण्यासाठी खास इअर कफ्सच्या प्रकारांविषयी माहिती देत आहोत. 

* मल्टी कलर्ड - आपल्या बेसिक व्हाईट शर्ट आणि जीन्सवर सुंदर दिसण्यासाठी चांदीचा मुलामा दिलेले मल्टी कलर्ड इअर कफ्सची निवड करु शकता. दुर्मिळ, ट्रायबल अशा या इअर कफमध्ये ब्राईट रंगदेखील असून, यांच्या साह्याने आपल्या लूकला हटके बनवू शकता.  

* डायमंड टच - काही इअर कफ्सना डायमंड चिपकवून तयार केले जातात, शिवाय यांनाच काठावरुन कट देण्यात येतो. यामुळे अत्यंत क्लासी दिसणारे हे इअर कफ्स अनारकली किंवा साडीवर घातल्यास पारंपारिक व कंटेम्पररी असा लूक तुम्हाला मिळेल. 

* गोल्ड विंग -  शोल्डर जॅकेट व चिनोजवर गोल्ड विंग इअर कफ्स घालून तुमचा लूक शार्प आणि क्रिस्प बनवू शकता. हे कफ्स सशक्त आणि बोल्ड असण्याचे प्रतिक मानले जातात.

* गोल्ड लीफ - मॅक्सी ड्रेस, आॅफ शोल्डर गाऊन किंवा लहंगा अशा कुठल्याही पेहरावावर सूट होण्यासाठी हे गोल्ड लीफ इअर कफ्स मोठ्या आकाराचे पानांच्या डिझाईनचे असून, एक परिपूर्ण अ‍ॅक्सेसरी आहेत. 

* कलर्ड स्टोन - आकाराने फार मोठे नसणारे हे इअर कफ्स पहिल्यांदाच घालण्यासाठी वापरणाऱ्या प्रत्येकीसाठी उपयोगी आहेत. हे कफ्स डे ड्रेसवर खूपच उठून दिसतात. 

 

Web Title: Separation of 'Year Cafés'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.