मुलांना कॅन्सरपासून वाचवा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 14:37 IST2016-01-16T01:07:10+5:302016-02-04T14:37:28+5:30

कॅन्सर आजही दूर्धर आजार आहे. लहानपणी कॅन्सरची लागण तर फारच वाईट.

Save children from cancer. | मुलांना कॅन्सरपासून वाचवा..

मुलांना कॅन्सरपासून वाचवा..

न्सर आजही दूर्धर आजार आहे. लहानपणी कॅन्सरची लागण तर फारच वाईट. लहान मुलांना कॅन्सर होण्याचे प्रमुख कारण त्यांच्या पालकांचा व्यावसाय/नोकरी, मेडिकल हिस्ट्री, तंबाखू-दारूचे व्यसन, खाणपान हे आहेत. या गंभीर आजारापासून आपल्या मुलाला लांब ठेवायचे असेल तर आपल्या जीवनपद्धतीमध्ये आरोग्यदायी बदल आवश्यक आहेत. कसे ते वाचा जरा.. १. आहार : या आजारापासून आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी अँटिऑक्सिडंट, मिनरल्स, व्हिटॅमिनचे प्रमाण जास्त असलेल्या भाज्या आणि फळे खाण्यास प्रोत्साहित करावे.
२. व्यायाम : मुलांना व्यायामाची सवय असली पाहिजे. पुरेशी शारीरिक हालचाल आरोग्यासाठी फार गरजेची असते.
३. बालवयातील लठ्ठपणा : लहान वयातच येणारा लठ्ठपणा फार गंभीर समस्या आहे. फास्ट फूड, जंक फूड, गोडधोड पदार्थांचे प्रमाण कमी करा.
४. युव्ही किरणांपासून बचाव : मुलांच्या अरोग्यासाठी अल्ट्रा व्हायलेट किरण खूप अपायकारक असतात. त्यामुळे यूव्ही किरणांपासून त्यांचा बचाव करा.
५. रोगप्रतिकारशक्ती वाढवा : योगर्ट, लसून, रंगीत फळे, भाज्यांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे घटक असतात. रोजच्या आहारात त्यांचा सामावेश असावा.
६. कॅन्सर लस : वयाच्या ११व्या किंवा १२व्या वर्षी कॅन्सर विरोधी एचपीव्ही लस टोचली पाहिजे. स्वादुपिंड, योनी, मानेच्या कॅन्सरपासून यामुळे बचाव होतो.

prevent for cancer

Web Title: Save children from cancer.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.