हिट अॅण्ड रन प्रकरणी सलमान पुन्हा अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 16:01 IST2016-07-05T10:31:38+5:302016-07-05T16:01:38+5:30
उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी सलमान खानची हिट अँड रन प्रकरणातून पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली होती.

हिट अॅण्ड रन प्रकरणी सलमान पुन्हा अडचणीत
उ ्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी सलमान खानची हिट अँड रन प्रकरणातून पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली होती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. हिट अॅण्ड रन प्रकरणी सुप्रीम कोर्टाने महाराष्टÑ शासनाच्या अर्जाला मंजुरी दिली असून लवकरच याबाबतची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरु होणार आहे. त्यामुळे आगामी सुलतान सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेला सलमान खान पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या वांद्रे येथे २००२ साली फुटपाथवर सलमानची गाडी चढली होती. या घटनेत फुटपाथवर झोपलेल्या एकाचा मृत्यू , तर इतर ३ जण जखमी झाले होते. सलमान खान दारु प्यायलेला असून तो स्वत:च गाडी चालवत होता, असा दावा सरकारी पक्षाचा आहे.