हृदयविकारावर मात करणारे प्रोटिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 14:41 IST2016-03-30T21:41:06+5:302016-03-30T14:41:06+5:30

 हृदयविकाराला कारणीभूत ‘कार्डियाक फायब्रोसिस’चे दुष्परिणाम कमी होतात.

The proteins that overcome the heart attack | हृदयविकारावर मात करणारे प्रोटिन

हृदयविकारावर मात करणारे प्रोटिन

शोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय चमुला असे प्रोटिन शोधण्यात यश आले आहे, ज्यामुळे हृदयविकाराला कारणीभूत ‘कार्डियाक फायब्रोसिस’चे दुष्परिणाम कमी होतात. ‘कार्डियाक फायब्रोसिस’मध्ये हृदयाच्या झडप प्रमाणापेक्षा अधिक जाड होते. 

हृदयातील स्वस्थ पेशींची जागा तंतुमय मेदयुक्त टिश्यूजने घेतल्यामुळे ‘कार्डियाक फायब्रोसिस’चा त्रास उद्भवतो. त्यामुळे हृदयाचे स्नायू कमजोर पडून हृदयविकार होण्याची शक्यता वाढते. संशोधकांच्या मते ‘सीसीएन५’ नावाच्या मॅट्रीसेल्युलर प्रोटिनचा कार्डियाक फाबोसिसवर उपचार करण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

माऊंट सिनाई येथील आयकाहन स्कूल आॅफ मेडिसीनचे प्राध्यापक रॉजर हज्जर यांनी सांगितले की, कार्डियाक फायब्रोसिसची प्रक्रिया उलट दिशेने फिरविण्यासाठी ‘सीसीएन५’ प्रोटिनची उपयुक्तता सिद्ध करणारे आमचे पहिलेच संशोधन आहे. यामध्ये काही विशिष्ट जनुकांवर लक्ष केंद्रित करून उपचार केले जातात. 

या संशोधनाचे निष्कार्ष जर्नल आॅफ अमेरिकन कॉलेज आॅफ कार्डियोलॉजी (जेएसीसी)मध्ये प्रकाशित करण्यात आले.

Web Title: The proteins that overcome the heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.