शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

ट्रेकिंगच्या आनंदाबरोबरच सावधगिरीही आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2016 3:52 PM

या हंगामात ट्रेकिंग करण्यासाठी अनेकजण बाहेर पडून निसर्गाचा मनमुराद आनंद लुटतात.

पावसाळा म्हटले तर आल्हाददायक वातावरण. त्यामुळे या हंगामात ट्रेकिंग करण्यासाठी अनेकजण बाहेर पडून निसर्गाचा मनमुराद आनंद लुटतात. हा आनंद आवश्य लुटा परंतु, धोक्याची व अवघड ठिकाणी पार करताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. अन्यथा ट्रेकिंग आपल्या  जीवावरही बेतू शकते. तसेच अलीकडे आलेल्या सेल्फी फॅडचा मोह हा सुद्धा धोक्याची ठिकाणी टाळावा.   ट्रेकिंग करताना अशी घ्या काळजी ट्रेकिंगच्या ठिकाणी आपण नवीन असतो, तेथे काय धोका आहे. हे आपल्याला माहिती नसते. त्याकरिता स्थानीक नागरिकांचा सूचनाचा मान ठेवावा. त्यामुळे धोका होऊ शकत नाही. ज्या ठिकाणी आपण ट्रेकिंगला जाणार आहोत. त्याची संपूर्ण माहिती आपल्याला राहत नाही. त्याकरिता ज्यांना माहिती आहे, अशा एखादा व्यक्तिला सोबत घ्यावे. रात्रीचा मुक्काम हा शक्यतो उघड्या व निर्जनस्थळी करणे टाळावा. त्याऐवजी एखादा मंदिरात किंवा तंबू ठोकून मुक्काम करावा. डोंगरामध्ये वाहत्या पाण्याची खोली आपल्याला माहिती राहत नाही. त्यामुळे त्याचा आनंद घ्यावा. परंतु, त्या पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करु नका. पाण्याचा अंदाज न आल्याने अनेकदा वाहून जाण्याच्या घटना घडलेल्या आहेत. ट्रेकिंगला पायात चप्पल किंवा सँडलऐवजी रबरी बूट घालावा, त्यामुळे दुखापत होत नाही. ज्यांच्यासोबत आपण ट्रेकिंगला जाणार आहोत, त्यांच्यातील एका जणांचा मोबाईल क्रमांक घरी देऊन ठेवावा. परत कधी येणार हे सुद्धा अंदाजाने सांगून ठेवावे. मद्यपान, धिंगाणा, आणि कर्णकर्कश गाणी ट्रेकिंगदरम्यान टाळावा. पावसाळ्यात डोंगरातील सर्व वाटा या निसरड्या झालेल्या असतात. त्यामुळे जास्त उतार व उंच कडा असलेल्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी. पाण्याच्या धबधब्याजवळ जातानाही पाय घसरण्याची मोठी भिती असते. त्याकरिता पाण्याच्या अतिजवळ जाणे टाळावे. ट्रेकिंग करताना कधीही इतराशी स्पर्धा करु नये. व इतरांना हिणवूही नाही. एखादा ठिकाणी चिखलामुळे किंवा अन्य कारणामुळे चालणे अवघड होत असेल तर माघारी फिरावे. तसेच निसर्गाचा वातावरणाचा  अंदाज घेऊनच निर्णय घ्यावा. तसेच ट्रेकिंग दरम्यान फाजील आत्मविश्वास टाळावा. असा आत्मविश्वास हा जीवावर बेतणारा असतो. सोबत मेडिटेशन किट ठेवावी. स्वयंपाक करण्याचे साहित्यही सोबत ठेवावे. सेल्फीचा मोहसेल्फी फॅड हे अलीकडे मोठ्या प्रमाणात आले आहे. ट्रेकिंगला गेल्यावर आठविण्यासाठी सेल्फी जरुर घ्यावा. परंतु, तो घेत असताना आपल्याला जीवाला धोका होईल, अशा ठिकाणी सेल्फी घेऊ नये. किल्याच्या शेवटच्या टेकावर, खोल दरीत, पाण्यात अशा धोकादायक ठिकाणी मोह आवरावा. ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध पण धोकादायक ठिकाणेचंदेरी किल्या :  हा किल्ला चढण्यासाठी अवघड आहे. पावसाळ्यात दगड पडण्याचा मोठा धोका आहे. वरती जाणारा रस्ता हा अत्यंत अरुं द आहे. नवख्यांना या किल्यावर जाण्याचा प्रयत्न करु नये. चिंचोटी धबधबा  : हा धबधबा सुद्धा धोक्याचा असून, येथे पाण्याच्या प्रवाहाचा व कुंडाचा आवाज न आल्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. पांडवगड : ट्रेकिंगसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. परंतु, अनेक दुर्घटना झाल्याने येथे बंदी घालण्यात आलेली आहे. कुंडेश्वर धबधबा : पावसाळा सुरु झाली की, अपघात होतोच अशी या धबधब्याची ओेळख बनली आहे. या कुंडाच्या आतमध्ये कपारी आहेत. याची सूचनाही दिली जाते, परतु, अतिआत्मविश्वासाने करुन अनेकजण आपले जीव गमवून बसतात. बुशी धरण : या धरणात अतिउत्साही पर्यटक मद्यपन करुन धरणाच्या पाण्यात उड्या मारतात. खोलीचा अंदाज न आल्याने अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. तरुणाईच्या आवडीचे हे एक ठिकाण आहे. परंतु, धोक्याचे ठिकाण म्हणूनही त्याला ओळखले जात आहे. माळशेज घाट : या ठिकाणी मोठमोठे धबधबे आहेत. घाटात रस्त्याच्या कडेला आनंद लुटताना अनेक अपघात झालेले आहेत.  रस्त्याच्या एका बाजूची दरी ही खूप खोल आहे. राजमाची : या वाटेवर घनदाट जंगल आहे. रस्ता माहित नसल्याने येथे अनेक अपघात झालेले आहेत. मुळशी - ताम्हिणी परिसर : हा परिसर खूपच नयनरम्य आहे. परंतु,  मद्यपी पर्यटकांच्या धिंगाणामुळे फार कमी जण कौटुंबिक सहलीसाठी येथे  जातात. तसेच या परिसरात लुटण्याच्या घटनाही अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे धोकादायक परिसर म्हणून त्याची ओळख बनली आहे. ------------------------------