शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

​उत्तम आरोग्यासाठी मैदानी खेळ आवश्यक ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 19:45 IST

मैदानी खेळ विसरल्याने अलीकडे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत.

हल्लीचे युग हे धावपळीचे आहे. तसेच इलेक्ट्रॉनीक साधने करमणुकीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत.  त्यामुळे अनेकजण मैदानावर खेळायला जाणेच विसरले आहेत. परंतु, त्याचे दुष्परिणामही भोगावे लागत आहेत.  त्यामुळेच सर्वांगीण विकासासाठी मैदानी खेळ हे खूपच गरजेचे आहेत. बॉलीवूडमधील  अनेक दिग्गज स्टारनी सुद्धा  खेळावर आधारित चित्रपटांमध्ये  भूमिका साकारलेल्या आहेत. यावरुनच उत्तम आरोग्यासाठी मैदानी खेळ हे किती आवश्यक आहे, हे वेगळी सांगण्याची गरज नाही. पूर्वी कुस्ती, कबड्डी, विटूदांडू, सुरपारंबी, लपंडाव आदी खेळ हे कुठेही फावल्या वेळामध्ये मुले  खेळत असे. मात्र, अलीकडे मुले एकत्र येऊनही, या खेळाऐवजी आपआपल्या मोबाईलमधील गेम खेळण्यातच दंग असतात. सोबत असूनही त्यांना एकमेकांना बोलण्यासाठीही पुरेसा वेळ मिळत नाही. घरी सुद्धा पालकांचे मुलांवर अभ्यासाचा दबाव असतो. रिकामा वेळ मिळाला तर त्यांच्या हातात मोबाईल किंवा टीव्हीचा रिमोट दिला जातो. त्यामुळे कॉर्टून पाहण्यात किंवा मोबाईल गेम खेळण्यातच वेळ जातो. रिकामा वेळ मिळूनही ते इलेक्ट्रॉनीक साधनातच रमून जातात. त्यामुळे मैदानी खेळच मुले काही प्रमाणात विसरत आहेत. तसेच शहरी भागात मैदाने उपलब्ध नसल्यानेही त्याचा खेळावर परिणाम झाला आहे. मैदानी खेळ न खेळल्याचे परिणाम मैदानी खेळ न खेळल्याने मुलांना अभ्यासातही निराशा येते. आळस येतो तसेच कोणतेच काम करण्यासाठी उत्साह वाटत नाही. मुलांचा स्वभावही एकलकोंडा होण्यास सुरुवात होते. मानवाच्या सर्वागीण विकासासाठी मैदानी खेळ  हे खूप आवश्यक आहेत. एकाग्रता  व दीर्घकाळ काम करण्याची क्षमता राहत नाही. तसेच आत्मविश्वासाचाही मनामध्ये अभाव असतो. शरीराचा बांधाही उत्तम राहत नसल्याने, पर्सनॅलिटीही उठवून दिसत नाही. मैदाने खेळ न खेळल्याने असे विविध प्रकारचे दुष्परिणाम आहोत.   खेळाचे फायदे खेळामुळेच इतर गुणांचाही विकास होत असतो. त्यामुळे आपले सुप्त गुणही विकसित होत असतात.खिलाडी वृत्ती, सांघिक वृत्ती, सहकार्य करण्याची वृत्ती, नेतृत्व, स्पर्धात्मक वृत्ती, एकाग्रता, सहनशीलता, आत्मविश्वास या गुणांचा नियमित खेळामुळे विकास होतो. त्याकरिता मानवाला व्यायाम हा खूप आवश्यक आहे. त्याक डे दुर्लक्ष केले तर विविध प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्याकरिता क्रिकेट बरोबर अन्य मैदानी खेळही खेळणे आवश्यक आहेत. बॉलीवूड स्टार खेळाडूच्या भूमिकेतसुलतान या चित्रपटात सलमान खान हा कुस्तीपटू दाखविण्यात आला आहे. सलमानने यापूर्वी खेळाशी संबंधीत कोणत्यात चित्रपटात काम केलेला नाही. खेळाची आवड असूनही, सुलतान हा त्याचा खेळाशी  संबंधीत पहिलाच चित्रपट आहे. प्रियंका चोप्रा हीने मेरी कोम मध्ये एक उत्तम बॉक्सींग पटूची भूमिका साकारलेली आहे. मुलगी असूनही तसेच  घर व गावातून कोणतीही पार्श्वभूमी नसताना, ती बॉक्सींगमध्ये सर्वोच्च स्थानावर पोहचते. अशी या चित्रपटाची कहाणी आहे. आमीर खान, शाहरूख खान, फरहान खान यांनी सुद्धा खेळावर आधारित चित्रपटातून भूमिका केल्या आहेत. ----------------