शरीराच्या 'या' भागांवर परफ्यूम लावणे ठरू शकतं घातक!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 11:30 AM2019-02-20T11:30:20+5:302019-02-20T11:31:20+5:30

रात्री पार्टी असो वा सामान्य गेट टुगेदर लोक फ्रेश होण्यासाठी किंवा आकर्षणासाठी डिओ अथवा परफ्यूमचा वापर करतात.

Perfume on these parts of the body may be risky | शरीराच्या 'या' भागांवर परफ्यूम लावणे ठरू शकतं घातक!

शरीराच्या 'या' भागांवर परफ्यूम लावणे ठरू शकतं घातक!

Next

(Image Credit : www.mirror.co.uk)

रात्री पार्टी असो वा सामान्य गेट टुगेदर लोक फ्रेश होण्यासाठी किंवा आकर्षणासाठी डिओ अथवा परफ्यूमचा वापर करतात. परफ्यूमचा सुगंध कायम रहावा यासाठी महिला आणि पुरूष दोघेही याचा पुन्हा पुन्हा वापर करतात. शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर परफ्यूमचा फवारा मारला जातो. पण याने त्वचेसोबतच इतर अंगांचंही नुकसान होतं. शरीराचे असे काही अंग आम्ही तुम्हाला सांगत आहोत, जिथे परफ्यूम वापरणे तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. 

हातावर - अनेकदा काही लोक हातावर परफ्यूम लावल्यावर दुसऱ्या हाताने ते घासतात. नंतर त्याचा सुगंध घेतात. पण असं केल्याने परफ्यूमचा सुगंध वाढत नाही तर कमी होतो. मगटावर परफ्यूम लावा आणि तसंच राहू द्या त्याचा सुगंध जास्त वेळ कायम राहतो. 

केसांवर - काही लोकांना सवय असते की, ते केसांवर परफ्यूम लावतात. पण ही सवय तुमच्यासाठी फार घातक ठरू शकते. कारण परफ्यूममध्ये अल्कोहोलचा वापर भरपूर केला गेलेला असतो. यामुळे केस रखरखीत आणि निर्जिव होऊ शकतात. 

कानांच्या मागे - अनेकदा महिला कानाच्या मागच्या बाजूला किंवा मानेवर परफ्यूम लावतात. पण कानाच्या मागच्या बाजूचा भाग फार संवेदनशील आणि ड्राय असतो. तेलकट जागांवर परफ्यूम जास्त वेळ टिकून राहतो. परफ्यूममध्ये असलेल्या केमिकल आणि अल्कोहोलमुळे त्वचा आणखी जास्त ड्राय होते. त्यामुळे अशा जागांवर परफ्यूम लावा जिथे मॉइश्चरायजरचा तुम्ही उपयोग करणार आाहात. 

प्रायव्हेट पार्टच्या आजूबाजूला - जर तुम्ही शॉर्ट किंवा लेग रिवीलिंग ड्रेस परिधान करत असाल आणि प्रायव्हेट पार्टच्या आजूबाजूला परफ्यूमचा वापर करत असाल तुम्ही फार मोठी चूक करताय. कारण पायांच्या मधे घर्षण झाल्यावर गरमी निर्माण होते आणि त्या जागेवर तुम्हाला खाज किंवा जळजळ होण्याची समस्या वाढते. 

कपडे आणि ज्वेलरीवर लावणे टाळा - हे नेहमीच पाहिलं जातं की, मुली परफ्यूम कपड्यांसोबतच ज्वेलरीवरही लावतात. पण अशाप्रकारे कपडे आणि ज्वेलरीवर परफ्यूम वापरल्याने दोन्हींचं नुकसान होतं. तसेच असं केल्याने परफ्यूमचा सुगंध सुद्धा जास्त वेळ कायम राहत नाही. 

अंडरआर्म्स - कधीच थेट अंडरआर्म्समध्ये परफ्यूमचा वापर करू नये. कारण येथील त्वचा फार संवेदनशील असते. थेट परफ्यूमचा वापर केल्याने घर्षण आणि जळजळ यामुळे येथील त्वचा काळी पडते. तसेच त्वचेसंबंधी आणखीही काही समस्या होऊ शकतात. 

Web Title: Perfume on these parts of the body may be risky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.