स्वादूपिंडाच्या कॅन्सरवर निंबाचा उपचार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2016 04:43 IST2016-02-14T11:43:15+5:302016-02-14T04:43:15+5:30

निंबाच्या झाडापासून मिळवण्यात येणारा अर्क स्वादूपिंडाच्या कॅन्सरवर उपचार करण्यासाठी खूप लाभदायक ठरू शकतो

Numbalgic treatment of tainted cancer? | स्वादूपिंडाच्या कॅन्सरवर निंबाचा उपचार?

स्वादूपिंडाच्या कॅन्सरवर निंबाचा उपचार?

ong>निंबाच्या झाडापासून मिळवण्यात येणारा अर्क स्वादूपिंडाच्या कॅन्सरवर उपचार करण्यासाठी खूप लाभदायक ठरू शकतो, असे एका नव्या अध्ययनातून समोर आले आहे. शरीरातील इतर निरोगी पेशींना कोणतेही नुकसान न पोहोचविता त्यामुळे उपचार करणे शक्य होणार आहे.

विशेष म्हणजे, भारतामध्ये निंबाचे झाड मोठ्या प्रमाणात आढळतात. निंबाच्या झाडापासून मिळणाºया निम्बोलाईड संयुगाचा उंदरावर प्रयोग केला असता  असे आढळून आले की, स्वादूपिंडाच्या कॅन्सरची वाढ आणि रोगसंक्रमणास त्यामुळे आळा बसला.

टेक्सास टेक युनिव्हर्सिटी हेल्थ सायन्स सेंटर येथील राजकुमार लक्ष्मनस्वामी यांनी सांगितले की, ‘निम्बोलाईडचा हा गुणधर्म खरोखरच आश्चर्यचकित करणारा आहे. इतर पेशींना कोणतीही हानी त्यापासून होत नाही.’

अध्ययानातून स्पष्ट झाले की, निम्बोलाईडमुळे कॅन्सर पेशींची वाढ आणि प्रसार ७० टक्क्यांनी कमी होतो. कॅन्सरला आक्रमक होण्यापासून अटकाव घालता येतो. स्वादूपिंडाच्या कॅन्सरचा प्रसार इतर शरीरात होण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे मृत्यू होण्याचा दरसुद्धा अधिक आहे.

Web Title: Numbalgic treatment of tainted cancer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.