​सोळाच्या आधी नो ‘दम लगा’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 03:21 IST2016-02-17T09:32:04+5:302016-02-17T03:21:53+5:30

वयाच्या सोळाव्या वर्षा आधी हुक्का किंवा तत्सम प्रकारे नशा केला असता मेंदूच्या कार्यकुशलतेवर परिणाम होऊन निर्णय क्षमता आणि स्वनियंत्रणात घट होते. 

No sixteen minutes before sixteen! | ​सोळाच्या आधी नो ‘दम लगा’!

​सोळाच्या आधी नो ‘दम लगा’!

ong>देव आनंदच्या ‘हरे राम हरे कृष्णा’मधील ‘दम मारो दम, मिट जाए गम’ या गाण्यातील झीनत अमान आजही सर्वांना आठवते. त्याकाळी या गाण्याने तुफान आणले होते. नशेत धुंद झालेल्या व्यसनाधीन पीढीचे जणू हे ‘अ‍ॅन्थम’च बनले.

मात्र, या कर्णमधूर गाण्याला फॉलो करणे तुम्हाला चांगलेच महागात पडू शकते. खास करून तुम्ही जर सोळपेक्षा कमी वयाचे असाल तर.

टेक्सास विद्यापीठातील ‘सेंटर फॉर ब्रेन हेल्थ’ येथील संशोधकांनी केलेल्या अध्ययनातून सिद्ध झाले की, वयाच्या सोळाव्या वर्षा आधी हुक्का किंवा तत्सम प्रकारे नशा केला असता मेंदूच्या कार्यकुशलतेवर परिणाम होऊन निर्णय क्षमता आणि स्वनियंत्रणात घट होते.

pot smoking

या संशोधनात २१ ते ५० वयोगटातील मॅरिहुआनाच्या आहारी गेलेल्या ४२ लोकांच्या मेंदूचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. यांपैकी २२ जणांनी १६ व्या वर्षा आधीपासून मॅरिहुआना स्मोक करण्यास सुरुवात केली होती तर इतरांनी १९ व्या वर्षांनंतर.

तुम्ही देखील अशा कोवळ्या वयात नशेच्या आहारी गेला असाल तर अजूनही वेळ गेलेली नाही. पुढील गोष्टी करून स्मोकिंगचे अनिष्ट परिणाम कमी करू शकता.

१. मेडिटेशन

meditation

स्वनियंत्रणात सुधार करण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे मेडिटेशन. रोज ध्यान किंवा चिंतन करण्याची स्वत:ला सवय लावा. पहिल्या सातच दिवसांत तुम्हाला सकारात्मक परिणाम लक्षात येतील. ‘इंटेग्रेटिव्ह बॉडी-मार्इंड ट्रेनिंग’मुळे तर पाच दिवसांत नशेची तलफ कमी होते.

२. व्यायाम

exercise

एरोबिक अ‍ॅक्टिव्हिटीजमुळे ( उदा. ब्रिस्क वॉकिंग, जॉगिंग, स्पीन क्लास) मेंदूच्या निर्णय घेण्याच्या भागाला थेट रक्तपुरवठा होतो. तुमचे वय कितीही असू द्या, नियमित व्यायामामुळे लक्ष, स्मरणशक्ती आणि प्लॅनिंग क्षमतेमध्ये सुधार होतो.

Web Title: No sixteen minutes before sixteen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.