​दीर्घायुष्याचे रहस्य उलगडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 02:59 IST2016-02-28T09:59:14+5:302016-02-28T02:59:14+5:30

दिवसातून थोडणे चालणे, शरीराची हालचाल होईल अशी कामे (उदा. भांडी-कपडे धुणे, झाडणे) करणे यामुळे सरासरी जीवनामानात वृद्धी होत असे एका नव्या संशोधनात दिसून आले.

The mystery of longevity unfolds | ​दीर्घायुष्याचे रहस्य उलगडले

​दीर्घायुष्याचे रहस्य उलगडले

र्घायुष्यी होणे कोणाला आवडणार नाही. ‘एव्हरलास्टिंग यूथ’चा शोध अनादी काळापासून मानव घेत आलेला आहे. अखेर जीवनमान वाढविण्याचे रहस्य उलगडले आहे. जास्त वर्षे जगण्यासाठी कोणते जादुई औषध वा मंत्र नाही तर एक दम सोपा उपाय आहे.

दिवसातून थोडणे चालणे, शरीराची हालचाल होईल अशी कामे (उदा. भांडी-कपडे धुणे, झाडणे) करणे यामुळे सरासरी जीवनामानात वृद्धी होत असे एका नव्या संशोधनात दिसून आले. अमेरिकेच्या डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला. ५० ते ७९ वयोगटातील सुमारे तीन हजार स्वयंसेवकांनी नॅशनल हेल्थ अँड न्युट्रिशन एक्झामिनेशन सर्व्हेमध्ये सहभाग घेतला होता.

प्रत्येक स्वयंसेवकांच्या हालचालींवर सात दिवस ‘अ‍ॅक्सेलोमीटर’सारख्या अतिसंवेदनशील सेन्सर्सद्वारे लक्ष ठेवण्यात आले. यावेळी असे दिसून आले की, सर्वाधिक निष्क्रिय लोकांचा त्याकाळात मृत्यू होण्याची शक्यता पाचपट अधिक असते.

old couple

पेन्सिलवेनिया विद्यापीठातील एझरा फिशमॅन यांनी सांगितले की, जे लोक नियमित व्यायाम करतात, एकाच जागी कमी बसतात, सतत हालचाल करत असतात ते जास्त काळ जगतात. शरीराची हालचाल होणे खूप गरजेचे आहे. डेस्कजॉबमुळे खूप समस्या निर्माण होऊ शकतात.

Web Title: The mystery of longevity unfolds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.