शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

असा तयार करा अ‍ॅपल मास्क; चेहरा दिसेल झक्कास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 20:01 IST

शारीरिक आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहावे, यासाठी नियमित एक तरी सफरचंद खाल्ले पाहिजे, असा सल्ला डॉक्टर देतात. पण तुम्हाला माहीत आहे का? हे सफरचंद फक्त आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्यसाठीही फायदेशीर ठरतं.

शारीरिक आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहावे, यासाठी नियमित एक तरी सफरचंद खाल्ले पाहिजे, असा सल्ला डॉक्टर देतात. पण तुम्हाला माहीत आहे का? हे सफरचंद फक्त आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्यसाठीही फायदेशीर ठरतं. अनेकदा सतत बाहेर फिरल्यामुळे चेहऱ्यावर घाण आणि मृत पेशी जमा होतात. यामुळे चेहऱ्याचं सौंदर्य बिघडतं. अशावेळी चेहऱ्याचा ग्लो परत मिळवण्यासाठी अनेक पार्लर ट्रिटमेंट घेतल्या जातात. तर कधी बाजारात मिळणाऱ्या महागड्या उत्पादनांचा आधार घेण्यात येतो. पण त्याऐवजी घरगुती किंवा नैसर्गिक पदार्थांचा वापर करणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर होण्यासोबतच चेहरा उजळण्यास मदत होते. अशातच चेहऱ्याच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही अ‍ॅपल मास्कचा वापर करू शकता. 

सफरचंदामध्ये आढळून येणारे गुणधर्म त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरत असून त्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी आणि अ‍ॅन्टी ऑक्सिडंट आढळून येतात. जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. तसेच याचे वैशिष्ट्य म्हणजे, अ‍ॅपल मास्क कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. जाणून घेऊया अ‍ॅपल मास्क तयार करण्याची पद्धत आणि फायदे...

अ‍ॅपल मास्क तयार करण्याची पद्धत :

अर्धं सफरचंद कापून ते स्मॅश करून घ्या. आता त्यामध्ये क्रिम असलेलं दूध एकत्र करून पेस्ट तयार करा. तुमचं अ‍ॅपल मास्क चेहऱ्यावर अप्लाय करण्यासाठी तयार आहे. आता तयार मास्क चेहऱ्यावर 20 मिनिटांसाठी लावून त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवून टाका.  

अ‍ॅपल मास्क चेहऱ्यावर लावण्याचे फायदे : 

1. सनबर्न आणि टॅनिंग होत असल्यास त्यापासून सुटका करण्यासाठी मदत करतं. 

2. अ‍ॅपल मास्कमध्ये ग्‍लायकोलिक अ‍ॅसिड असतं. जे त्वचेवरील सर्व पोर्स स्वच्छ करण्यासोबतच मृत पेशी काढून टाकण्यासाठी मदत करतात. 

3. चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि पिम्पल्सची समस्या दूर करण्यासाठीही अ‍ॅपल मास्क मदत करतं. 

4. डोळ्यांखालील काळी वर्तुळं आणि डार्क सर्कल्सची समस्या दूर करण्यासाठी मदत करतं. त्यासाठी तुम्ही अ‍ॅपल मास्क लावण्याव्यतिरिक्त अ‍ॅपल स्लाइस कापूनही डोळ्यांवर ठेवू शकता.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजी