बाकी काही असो - नसो पण पुरूषांनी बाथरूममध्ये आवर्जुन ठेवावी तुरटी, फायदे इतके की विचारही केला नसेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 11:47 IST2026-04-09T11:47:10+5:302026-04-09T11:47:48+5:30
Alum Benefits For Men : खासकरून पुरूषांना आपल्या बाथरूममध्ये तुरटी का ठेवावी आणि तिचा कसा कसा वापर करू शकता हे माहीत असलं पाहिजे.

बाकी काही असो - नसो पण पुरूषांनी बाथरूममध्ये आवर्जुन ठेवावी तुरटी, फायदे इतके की विचारही केला नसेल
Alum Benefits For Men : आपण पाहतो की, सलूनमध्ये शेव्हिंग केल्यानंतर आजही अनेकजण चेहऱ्यावर तुरटी फिरवतात. पूर्वी आफ्टर शेव्ह म्हणून तुरटीचा वापर खूप व्हायचा. अलिकडे तो जरा कमी झालाय. पण आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, महागडे आफ्टर शेव्ह वापरण्यापेक्षा नॅचरल तुरटी कधीही चांगली. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे तुरटीचा वापर केवळ आफ्टर शेव्ह म्हणून नाही तर इतरही अनेक समस्या दूर करण्यासाठी करता येतो. अशात खासकरून पुरूषांना आपल्या बाथरूममध्ये तुरटी का ठेवावी आणि तिचा कसा कसा वापर करू शकता हे माहीत असलं पाहिजे. असं केलं तर आपले बरेच पैसेही वाचतील आणि आपल्या अनेक समस्या स्वस्तात दूर होतील.
तुरटीचे फायदे
नॅचरल आफ्टर शेव
शेव्हिंग केल्यानंतर तुम्ही तुरटीचा वापर आफ्टर शेव्ह म्हणून करू शकता. दाढी करताना झालेली जखम याने लगेच भरून निघते आणि त्वचाही चांगली होते. तुरटीने त्वचेवरील धूळ - माती निघून जाते आणि त्वचेची रोमछिद्रे मोकळी होतात. यामुळे चेहरा आणखी खुलून दिसतो.
घामाची दुर्गंधी
घामाची दुर्गंधी ही उन्हाळ्यात फारच वैताग देते. आपल्याला स्वत:ला तर त्रास होतोच, आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही होतो. लोक आपल्यापासून दूर पळू लागतात. डीओ किंवा परफ्यूम लावूनही या दिवसात घामाची दुर्गंधी येतेच येते. अशात तुरटी आपली मदत करू शकते. आंघोळ करताना तुरटी पाण्यात भिजवून फक्त काखेत फिरवा. या उपायाने कितीही घाम आला तरी घामाची दुर्गंधी मात्र येणार नाही. कारण दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया तुरटीने नष्ट होतात.
तोंडाची दुर्गंधी
जशी घामाची दुर्गंधी मोठी समस्या आहे, तशीच तोंडाची दुर्गंधी देखील आहे. ही समस्या सुद्धा तुरटीच्या मदतीने दूर होऊ शकते. चिमूटभर तुरटी पावडर आणि काळं मीठ एक ग्लास पाण्यात टाका. या पाण्याने दिवसातून दोन वेळा गुरळा करा. याने तुमच्या तोंडाची दुर्गंधी दूर होईल.
नॅचरल टोनर, सूज कमी करतं
तुरटी त्वचेला टोन करण्याचं काम करते. याने त्वचेची रोमछिद्रे मोकळी होतात. ज्यामुळे चेहराही स्वच्छ आणि तजेलदार दिसू लागतो. बाजारातील केमिकलयुक्त टोनरचा वापर करण्याऐवजी तुरटी कधीही बेस्ट ठरते. कारण याने काहीच साइड इफेक्ट्स होत नाहीत. तसेच याने चेहऱ्यावरील सूज आणि पुरळही दूर होते.
डार्क सर्कल
डार्क सर्कल काय फक्त महिलांनाच होतात असं नाही. पुरूषांना देखील ही समस्या होते. झोप पूर्ण न झाल्याने अनेकदा डोळ्यांखाली काळे डाग दिसतात. हे डाग दूर करण्यासाठी तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. यासाठी थोडं तुरटी पावडर पाण्यात मिक्स करू डागांवर लावा. काही वेळाने चेहरा पाण्याने धुवून घ्या. डार्क सर्कल कमी झालेले दिसतील. फक्त डोळ्यात तुरटी जाऊ नये याची काळजी घ्या.