पुरुषांनी चेहऱ्याची 'अशी' घ्यावी काळजी, दिवसभर चेहरा दिसणार फ्रेश!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 11:58 AM2019-11-14T11:58:56+5:302019-11-14T11:59:32+5:30

चेहऱ्याची किंवा त्वचेची काळजी घेणे हे केवळ महिलांचं काम नाहीये. पुरुषांनीही आपल्या चेहऱ्याची काळजी घेणे गरजेचे असते. तर ते अधिक हॅंडसम आणि त्यांचा चेहरा तजेलदार दिसू शकतो.

Men can follow these 5 tips to clear skin | पुरुषांनी चेहऱ्याची 'अशी' घ्यावी काळजी, दिवसभर चेहरा दिसणार फ्रेश!

पुरुषांनी चेहऱ्याची 'अशी' घ्यावी काळजी, दिवसभर चेहरा दिसणार फ्रेश!

googlenewsNext

चेहऱ्याची किंवा त्वचेची काळजी घेणे हे केवळ महिलांचं काम नाहीये. पुरुषांनीही आपल्या चेहऱ्याची काळजी घेणे गरजेचे असते. तर ते अधिक हॅंडसम आणि त्यांचा चेहरा तजेलदार दिसू शकतो. अचानक येणारे पिंपल्स किंवा स्किन इन्फेक्शन कुणासाठीही डोकेदुखी ठरु शकते. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. या टिप्सच्या माध्यमातून तुम्ही चेहऱ्याची स्वच्छता चांगल्याप्रकारे करु शकता. 

चेहरा साफ करणे

(Image Credit : tiege.com)

सर्वातआधी चेहरा पाण्याचे चांगला धुवा. चेहरा धुणे याचा अर्थ चेहऱ्या पाण्याचे काही थेंब शिंपडणे नाही. चेहरा धुण्यासाठी तुम्ही एखादा चांगला साबण किंवा चांगल्या फेसवॉशचा वापर करु शकता. चेहरा धुताना घाई अजिबात करू नका.

शेविंग करताना काळजी

(Image Credit : luxuryshaves.com)

चेहऱ्याचं चांगलं-वाईट दिसणं हे तुमच्या शेव्ह करण्याच्या पद्धतीवरही अवलंबून असतं. रेजरमुळे त्वचेची जळजळ होऊ शकते आणि काही दिवसांनी पिंपल्सही येऊ शकतात. त्यामुळे रेजरचा वापर काळजीपूर्वक करा आणि योग्य त्या शेव्हिंग क्रिम-जेलचा वापर करावा. यानेही तुमची समस्या दूर होईल. इतकेच नाही तर त्वचा आणखी चांगली करण्यासाठी पोस्ट-शेव्ह बामचाही वापर करा.

मृत पेशी दूर करा

(Image Credit : Social Media)

चेहऱ्यावरील मृत पेशी दूर करण्याचं काम केवळ महिलांचं नाहीये. ही काळजी पुरुषांसाठीही गरजेची आहे. आठवड्यातून कमीत कमी एकदा चेहऱ्याच्या मृत पेशी दूर कराव्यात. याने चेहऱ्याची सर्व घाण निघून जाते आणि रोमछिद्र मोकळे होतात. यासाठी तुम्ही घरीच तयार केलेला एखादा स्क्रब वापरु शकता.

मॉईश्चराइज

चेहऱ्याची चमक कायम ठेवण्यासाठी चेहरा ड्राय होऊ देऊ नका. चेहऱ्याचा ओलावा कायम ठेवण्यासाठी तुम्ही जेल बेस्ड एखाद्या मॉइश्चरायजरचा प्रयोग करु शकता. याचा तुम्ही दररोज वापर करु शकता.

हायड्रेट रहा

वरील सर्व महत्त्वाच्या गोष्टींसोबतच तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे पाणी. पाणी केवळ तुमची तहान भागवतं असं नाही तर तुमच्यासाठी औषध म्हणूनही काम करतं. पाण्याच्या कमतरतेमुळे चेहऱ्यायाचा ग्लो नष्ट होतो. जर तुम्हाला चेहऱ्याची चमक कायम ठेवायची असेल तर दिवसातून कमीत कमी ८ लिटर पाणी प्यावं लागेल. याचा अर्थ एकावेळी फार जास्त पिऊ नये. दिवसभर थोडं थोडं पाणी प्यायल्यासही चालतं.

हे उपाय ठेवतील तुम्हाला तरूण

1. कोरफड 

त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरणारी कोरफड आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. यामध्ये आढळून येणारे अॅन्टीऑक्सिडंट चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. कोरफडीचा वापर केल्याने चेहऱ्याची त्वचा मुलायम होते आणि आवश्यक ते पोषण त्वचेला मिळतं. कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावून काही वेळ तसचं ठेवा. 

2. दही 

दही खाण्यासाठी जेवढं आरोग्यदायी असतं. तेवढचं आपल्या त्वचेसाठीही ते फायदेशीर ठरतं. त्वचेसाठी दह्याचा वापर केल्याने त्वचा मुलायम होते आणि चेहऱ्यवरील घाण दूर होण्यास मदत होते. चेहरा स्वच्छ करण्यासाठी एक चमचा दही घ्या आणि फेसवॉशप्रमाणे चेहऱ्यावर लावा. 

3. कच्चं दूध

दूध आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतं. यासोबत दूध त्वचेसाठी अत्यंत उपयोगी ठरतं. कच्च्या दूधामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम यांसारखी अनेक पोषक तत्व असतात. जी त्वचेचा रंग उजळवण्यासाठी मदत करतात. चेहऱ्यावर कॉटनच्या मदतीने कच्चं दूध लावा आणि सुकल्यानंतर चेहरा धुवून टाका. यामुळे चेहऱ्याचा ग्लो वाढवण्यास मदत होते. 

4. गुलाब पाणी 

गुलाब पाणी आपला चेहरा स्वच्छ करण्यासोबतच त्वचा मुलायम करण्यासाठीही मदत होते. गुलाब पाणी रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा आणि मालिश करा. सकाळी चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो. 


Web Title: Men can follow these 5 tips to clear skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.