लठ्ठपणामुळे दहा वर्षांनी कमी होते आयुष्यमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 22:53 IST
जास्त वजन असेल तर एक वर्ष आणि लठ्ठपणा असेल दहा वर्षांपर्यंत आयुष्यमान कमी होते.
लठ्ठपणामुळे दहा वर्षांनी कमी होते आयुष्यमान
लठ्ठपणा आरोग्यासाठी किती घातक असतो हे वेगळे सांगण्याी गरज नाही. परंतु गरजेपेक्षा जास्त प्रत्येक किलोभर वजन तुमच्या आयुष्यातील काही वर्षे कमी करतेय हे तुम्हाला माहित आहे का?एका विस्तृत संशोधनातून असे समोर आले की, जास्त वजन असेल तर एक वर्ष आणि लठ्ठपणा असेल दहा वर्षांपर्यंत आयुष्यमान कमी होते.थोड्याशा जास्त वजनामुळे विशेष असा फरक पडत नाही, अशा गैरसमजुतीला या नव्या संशोधनामुळे खीळ बसली आहे. कंबरेच्या वाढत्या घेराबरोबरच सत्तरीच्या आधीच मृत्यू होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे, असे निरीक्षण या अध्ययनात नोंदविण्यात आले आहे.प्रमुख संशोधक आणि केम्ब्रिज विद्यापीठातील इमॅन्युएल डी अँजेलॅन्टोनिओ यांनी माहिती दिली की, या संशोधनातून हे सिद्ध होते की, लठ्ठपणामुळे वेळेच्या आधी मृत्यू होऊ शकतो. वाढत्या वजनासह हृदयविकार, स्ट्रोक, श्वसनविकार, कॅन्सरसारख्या रोगांची धोका वाढते हे वेगळे सांगायला नको.चार खंडातील १ कोटी ६ लाख लोकांची १९७० ते २०१५ दरम्यान २३९ अध्ययनांतून गोळा झालेल्या माहितीचा आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या एका टीमने अभ्यास करून हे निष्कर्ष काढले.