नवीन यूनिक डिझाइन्सच्या मदतीने साध्या मेहंदीला वेस्टर्न लूक द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 16:17 IST2018-08-30T16:08:50+5:302018-08-30T16:17:22+5:30

श्रावण म्हटलं की, सण आलेच आणि सण म्हटलं की, स्त्रियांचा श्रृगांर आलाच. कदाचितच असा कोणता सण असेल की ज्या सणाला महिला हातावर मेहंदी काढत नसतील.

latest designs of mehndi on festive season | नवीन यूनिक डिझाइन्सच्या मदतीने साध्या मेहंदीला वेस्टर्न लूक द्या!

नवीन यूनिक डिझाइन्सच्या मदतीने साध्या मेहंदीला वेस्टर्न लूक द्या!

श्रावण म्हटलं की, सण आलेच आणि सण म्हटलं की, स्त्रियांचा श्रृगांर आलाच. कदाचितच असा कोणता सण असेल की ज्या सणाला महिला हातावर मेहंदी काढत नसतील. आधी हातावर मेहंदी काढणं ही परंपरा मानली जायची, पण आता मेहंदी काढणं हा एक फॅशन फंडा झाला आहे. त्यामुळे अनेक महिला आणि तरूणी मेहंदीचं खास डिझाइन काढणं पसंत करतात. यामध्ये मेहंदीचं सौंदर्य आणखी खुलवण्यासाठी स्पार्कल, स्टोन, पर्ल, ग्लिटर यांसारख्या गोष्टींचा वापर केला जातो.  त्यातच अनेक महिला अशाही आहेत ज्या पूर्ण हातावर मेहंदी काढण्याऐवजी लाइट पण यूनिक डिझाइन काढणं पसंत करतात. 

तुम्हीही अशा काही यूनिक डिझाइन शोधत असाल तर, आम्ही तुम्हाला काही यूनिक डिझाइन्स सांगणार आहोत.

ही यूनिक आणि सिम्पल डिझाइन सध्या ट्रेन्डमध्ये आहे.

जर तुम्हाला जास्त मेहंदी लावायची नसेल तर फिंगर्सवर अशाप्रकारे तुम्ही यूनिक डिझाइन काढू शकता.

हाताच्या मधल्या बोटावर यूनिक डिझाइन काढून तुम्ही ट्रेडिशनल मेहंदीला यूनिक लूक देऊ शकता.

सध्या ही फ्लॉवर मेहंदी डिझाइन फार ट्रेन्ड करत आहे.

तुम्ही अशाप्रकारे शेवटच्या बोटावर मेहंदी काढून सुंदर लूक देऊ शकता.

बॅक हॅन्डवर मेहंदीचं हे डिझाइन फार यूनिक आहे.

तुम्ही शक्य असल्यास सुंदर वेल काढून आपल्या हाताला डिफरन्ट लीक देऊ शकता.
 

Web Title: latest designs of mehndi on festive season