पिंपल्सची 'ही' कारणं तुम्हाला माहीत असतील तरच मिळवाल पिंपल्समुक्त चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 11:20 AM2020-01-31T11:20:11+5:302020-01-31T11:21:23+5:30

त्वचेवर पिंपल्स येण्याची समस्या तरूण वयीन मुलींमध्ये अधिक दिसून येते.

Know the reasons behind pimples and acne | पिंपल्सची 'ही' कारणं तुम्हाला माहीत असतील तरच मिळवाल पिंपल्समुक्त चेहरा

पिंपल्सची 'ही' कारणं तुम्हाला माहीत असतील तरच मिळवाल पिंपल्समुक्त चेहरा

googlenewsNext

त्वचेवर पिंपल्स येण्याची समस्या तरूण वयीन मुलींमध्ये अधिक दिसून येते. पण तुम्हाला माहीत आहे का असं होतं. या वयात जलदगतीने हार्मोनल बदल होत असतात. त्यामुळेच हार्मोन्सचे संतुलन बिघडून त्वचेवर पिंपल्स येत असतात. सुरूवातीला पिंपल्स जेव्हा येतात तेव्हा ते एखाद्या दाण्याप्रमाणे असतात. नंतर दोन दिवसात ते त्याचे स्वरूप बदलत आणि मोठ्या आकाराच्या पुळ्यांमध्ये रुपांतर होतं. नंतर या डाग सुद्धा चेहरा आणि त्वेचवर येत असतात. पिंपल्समुळे आपल्याला शारीरिक त्रासाबरोबरच मानसीक त्रासाचा सामना सुद्धा करावा लागत असतो. कारण पिंपल्समुळे  आपला लूक खराब होत असतो.  आज आम्ही तुम्हाला पिंपल्स का येतात याची कारण सांगणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही पिंपल्स येण्यापासून रोखू शकता.


हार्मोनल बदल

शरीरातील हार्मोन्समधील बदल, काही रासायनिक औषधांचे दुष्परिणाम, स्त्रीयांमध्ये घेतल्या जाणार्‍या हार्मोन्स असणारी औषधे यामुळे पिंपल्स उत्पन्‍न होऊ शकतात. या बरोबरच पोट साफ नसेल तर शरीरातील नको असेलेले विषारी पदार्थ त्वचेद्वारे बाहेर पडायला सुरूवात होते.  शरीरात पित्ताचे प्रमाण अधिक असणे, कोलायटीस, रक्‍तात वाढणारी उष्णता, यांमुळे त्वचेवर पिंपल्स येत असतात.

चुकीचा आहार

तिखट, चमचमीत मसालेदार पदार्थांचे, तळलेल्या पदार्थांचे वारंवार सेवन केल्यामुळे त्वचेवर पिंपल्स येतात. त्यासाठी आहारात फळांचा जास्तीत जास्त समावेश करणं गरजेचं आहे.  संत्री, द्राक्ष या फळांचा आहार घेतल्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होईल. त्वचेच्या तैलग्रंथी उत्तेजीत होऊन पिंपल्सची समस्या वाढत जाते.

केमिकल्सयुक्त क्रिम्सचा वापर

आकर्षक  आणि सुंदर दिसण्यासाठी फेअरनेस क्रीम आणि स्टिरॉईड्स असलेली क्रीम चेहऱ्यावर लावली जातात. या स्टिरॉईड औषधांचा एक परिणाम म्हणून त्वचा पांढरी पडते. तो गोरेपणा नसतो. या क्रीममुळे पिंपल्स वाढतात.

ताण-तणाव

स्त्रियांच्या अनियमित मासिक पाळीमुळे पिंपल्स येण्याचा त्रास असेल तर पाळी नियमित येण्यासाठी वेगळे उपचार घेणे गरजेचे ठरते. तसचं दैनंदिन आयुष्य जगत असताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो त्यामुळे ताण- तणाव वाढल्यामुले त्वचेवर पिंपल्स येतात. ( हे पण वाचा-चमकदार आणि मुलायम त्वचेसाठी आंघोळीच्या पाण्यात टाका दूध, मग बघा कमाल! )

पिंपल्स घालवण्यासाठी अशी घ्या काळजी

दिवसभरात दोनदा चेहरा धुवा, जास्त चेहरा धुवू नका यामुळे त्वचा कोरडी होईल, त्वचेच्या इतर समस्या निर्माण होतील. ऑईल फ्री सौंदर्य प्रसाधनांचा वापर करा, पिंपल्स फोडू नका त्यामुळे बॅक्टेरिया पसरतात, व्रण कायमचे राहतात, केमिकल्स नसलेल्या क्रिम्सचा वापर करा. आहार घेताना शरीरासाठी पोषक असलेल्या पदार्थांचा समावेश करा.  ( हे पण वाचा-पिंपल्सचं टेन्शन नेहमीसाठी दूर करायचंय? ओल्या हळदीचा वापर ठरेल सगळ्यात बेस्ट उपाय)

Web Title: Know the reasons behind pimples and acne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.