जंक फूड खाऊन केले वजन कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 02:15 IST2016-02-18T09:15:41+5:302016-02-18T02:15:41+5:30
वाढते वजन, लठ्ठपणा ही समस्या विशेष करून लहान मुलांमध्ये फार कॉमन झाली आहे. या मागे सर्वात मोठे कारण म्हणजे जंक फूड!

जंक फूड खाऊन केले वजन कमी
वाढते वजन, लठ्ठपणा ही समस्या विशेष करून लहान मुलांमध्ये फार कॉमन झाली आहे. या मागे अनेक कारणे आहेत; मात्र सर्वात मोठे कारण म्हणजे जंक फूड!
डॉक्टर सांगतात की, वजन घटविण्यासाठी जंक फुड खाऊ नका, सकस-पोषक आहार घ्या. परंतु जेफ विल्सरने त्यांना चक्क तोंडावर पाडले आहे.
या पठ्याने हिरव्या पालेभाज्यांऐवजी संपूर्ण महिनाभर चॉकलेट, डोनट, बर्गर, कॉर्न नट्स, एम अँड एम, सँडविच असे जंक फूड खाल्ले. परंतु असे करत असताना त्याने दर दिवशी केवळ दोन हजार कॅलरी हे प्रमाण कायम ठेवले.
महिनाभरानंतर जेव्हा त्याने वजन मोजले असता त्याला विश्वासच बसला नाही. त्याचे वजन वाढण्याऐवजी सुमारे पाच किलोंनी कमी झाले.
डॉक्टरांच्या मते एवढ्या कमी कालावधीत एवढे वजन कमी होणे सामान्य गोष्ट नाही. इतकेच नाही तर त्याचे हानीकारक कोलेस्टेरॉल कमी झाले, चांगले कोलेस्टेरॉल वाढले, दोन टक्के बॉडी फॅट कमी झाले.
यावरून हे सिद्ध होते की, प्रॉब्लेम जंक फुड नाही तर कॅलरीज् आहेत. तुमच्या गरजेपेक्षा अधिक कॅलरीज्चे सेवन केले असता वजन, मेद आणि इतर आरोग्याला हानीकारक गोष्टींचे दूष्परिणाम वाढतात.