'या' मेकअप प्रोडक्ट्साठी क्रेझी आहे जान्हवी कपूर; मेकअप आर्टीस्टने केला खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 11:39 IST2018-09-06T11:38:09+5:302018-09-06T11:39:30+5:30
'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दणक्यात पदार्पण करणारी आणि दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी, अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या आपल्या नव्या प्रोजेक्ट्सची निवड करण्यात बिझी आहे.

'या' मेकअप प्रोडक्ट्साठी क्रेझी आहे जान्हवी कपूर; मेकअप आर्टीस्टने केला खुलासा!
'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दणक्यात पदार्पण करणारी आणि दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी, अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या आपल्या नव्या प्रोजेक्ट्सची निवड करण्यात बिझी आहे. चित्रपटांव्यतिरिक्त जान्हवी लॅक्मे फॅशन वीकसारख्या मोठ्या इव्हेंट्समध्ये रॅम्प वॉक करताना दिसली आहे. यावरून हे सिद्ध होतं की, जान्हवी इंडस्ट्रीमध्ये आपला जम बसवण्याच्या तयारीत आहे.
View this post on Instagram
जान्हवी फॅन्समध्ये अभिनय, डान्स यांव्यतिरिक्त तिची फॅशन आणि मेकअपसाठीही प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध इंग्रजी वेबसाइट idiva.com ला जान्हवी कपूरचे आवडते मेकअप आर्टीस्ट वरदान नायक यांनी मुलाखत दिली. या मलाखतीमध्ये वरदानने जान्हवीचा मेकअप लूक आणि मेकअप करताना कोणत्या गोष्टी सर्वाधिक आवडतात त्याबाबत सांगितले.


जान्हवीशिवाय वरदानने ईशा अंबानीबाबतही सांगितलं. अंबानींच्या कुटुंबात मागील वर्षात जेवढे कार्यक्रम पार पडले त्यामध्ये अंबानींच्या लाडक्या ईशाचा मेकअप वरदाननेच केला होता.
View this post on Instagram
वरदानच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ईशा अंबानीचे अनेक फोटोदेखील आहेत. ईशाव्यतिरिक्त आलिया भट्ट, जॅकलीन फर्नांडिस, कियारा अडवानी, परिणीती चोप्रा यांसारख्या सेलिब्रिटींचे मेकअपही वरदानने केले आहेत.